Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

चाळीसगाव तालुक्यात MRGS योजनेतील विकासकामांच्या चौकशीची मागणी!* , *अपूर्ण कामांची बिले काढल्याचा गंभीर आरोप; दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार*

ईश्वर रामदास महाजन 16 Oct 2026, 07:27 1K views अपडेटेड 26 Oct 2026, 07:21 4 min read
🔧 साधने:
चाळीसगाव तालुक्यात MRGS योजनेतील विकासकामांच्या चौकशीची मागणी!* ,   *अपूर्ण कामांची बिले काढल्याचा गंभीर आरोप; दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार*

चाळीसगाव | प्रतिनिधी*

चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत MRGS योजनेतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संपादक श्री. कल्पेश विजय महाले यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती करिष्मा नायर यांच्याकडे अति तातडीचा तक्रार अर्ज सादर केला आहे.

*अपूर्ण कामे, काही ठिकाणी कामेच नसल्याचा आरोप!*

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये MRGS योजनेअंतर्गत गावांतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, गोठा शेड, शेततळे आणि सिंचन विहिरी यांसारखी विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी कामे प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचे, तर काही गावांमध्ये कामे झालेली नसतानाही संबंधित कामांची बिले काढण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

*चार आर्थिक वर्षांतील कामांची चौकशी करण्याची मागणी*

चाळीसगाव पंचायत समितीच्या MRGS शाखेअंतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या चार आर्थिक वर्षांतील विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीसोबत संबंधित ग्रामपंचायतींची नावे, कामांचे कोड आणि कामांसाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या रकमेची सविस्तर माहिती जोडण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

*प्रत्यक्ष स्थळपाहणी करून दोषींवर कारवाई होणार का?*

संबंधित कामांची कागदोपत्री माहिती तपासण्याबरोबरच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामांची गुणवत्ता, पूर्णत्वाची स्थिती आणि बिलांच्या रकमेची पडताळणी करण्यात यावी. चौकशीत अनियमितता अथवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा इतर दोषींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का? संबंधित विकासकामांची प्रत्यक्ष तपासणी होऊन वस्तुस्थिती समोर येणार का? याकडे चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची भरारी; वाचन प्रेरणा दिनी विद्यार्थ्यांना ‘नागपूर दर्शन’ची अनोखी संधी! , मारवड विकास मंचचा स्तुत्य उपक्रम; ५५ विद्यार्थ्यांचा परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग पुढील बातमी →प्रताप' मध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न*- ● डॉ.ए.पी.जे.कलाम यांना अभिवादन ● राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!