Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

ब्राम्हणवाडा येथे शालेय वस्तूचे वाटप

ईश्वर रामदास महाजन 15 Oct 2026, 12:24 993 views अपडेटेड 18 Oct 2026, 22:17 3 min read
🔧 साधने:
ब्राम्हणवाडा येथे शालेय वस्तूचे वाटप

ब्राम्हणवाडा येथे शालेय वस्तूचे वाटप

ब्राम्हणवाडा, ता. अकोला, जि. अहिल्यानगर | दि. १४ ऑक्टोबर २०२६

सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गौतमराव शिंदे यांनी आपली नात कु. शिवांशी रोकडे हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला.

वाढदिवसाचा आनंद केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी संगारे वसतिगृह व आश्रमशाळेतील गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर अशा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

वाढदिवस साजरा करण्याची ही आगळी पद्धत समाजासमोर एक आदर्श ठेवणारी आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी संगारे वसतिगृहाचे अधीक्षक मा. देठे सर, संगारे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मा. प्रकाश लांडगे सर, डॉ. अजातशत्रू शिंदे, सौ. वर्षा रोकडे, श्री. मिलिंद रोकडे, सौ. संगिता शिंदे, एडिटर शुभम गायकर, तसेच आयुष्यमान आरोग्यवर्धिनी ब्राम्हणवाडा केंद्रातील सिस्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा वाढदिवसाचा आनंद असल्याची भावना शिंदे परिवाराने व्यक्त केली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पुढील बातमी →उजेड पेरणारी माणसं : विचार, प्रेरणेची दिवटी*

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!