असामान्य जिद्द ठेवून स्वप्न साकार करणारे मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम!!

असामान्य जिद्द ठेवून स्वप्न साकार करणारे मिसाईल मॅन
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम!!
भारत देश असंख्य मानवी रत्नांचे माहेर घर आहे. ज्या महान विभूतींनी जगाला भारताकडे ज्ञान लालसेने पहावयास भाग पाडले. असे अफलातून नररत्ने या देशामध्ये निर्माण झाले. अशाच एका महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम. तामिळनाडू राज्यात रामेश्वरम गावात १५ ऑक्टोबर १९३१ ला मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज श्रीमंत होते. त्यांच्याकडे जमिनी होत्या. कालांतराने परिस्थिती बेताची झाली. वडील बोट चालविण्याचे काम करीत.आईचे नाव आशिअम्मा होते. ती सात्विक, शांत, सोज्वळ महिला होती. एपीजे अब्दुल कलाम हे एकूण पाच भावंडे होती. वडील जैनुलब्दीन विचारी , परोपकारी व्यक्ती होते. गावातल्या सर्व समाजाच्या लोकांशी उत्तम संबंध त्यांनी प्रस्थापित केलेले होते. त्यांच्या घराच्या काही पावलावर मंदिरे होती. मंदिराच्या व्यवस्थापनाशी त्यांचा कनिष्ठ संबंध होता. शिक्षणाचे अतोनात आवड होती त्यामुळे एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांनी चांगले शाळेमध्ये टाकले. प्राथमिक शिक्षण रामेश्वरम येथील शाळेत झाले. रामनाथपुरम येथे सेकंडरी स्कूल मध्ये झाले. बीएससी फिजिक्स विषयात पदवी घेतली. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये पदवी घेतल्यानंतर मद्रास येथे एरोनॉटिकल इंजिनिअरची पदवी घेतली. आपली आकाशामध्ये उडण्याची तीव्र इच्छा त्यामुळे पूर्ण करता आली. हिंदू व मुस्लिम या दोन्ही संस्कृतीचा व मानवी मूल्यांचा अभ्यास बालपणापासून करीत आले. मानवता हाच सर्व धर्माचा पाया आहे. सर्वोत्तम स्वप्न ठेवणाऱ्या व कृतीशील प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जगात अशक्य काहीच नाही असे ते नेहमी म्हणत. आपल्या मित्राच्या मदतीने वर्तमान पेपर वाटप करण्यापासून ते अनेक कामे त्यांनी बालवयापासून केली. वाचनाची दुर्दम्य इच्छा असलेला हा तरुण आपल्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या त्यामध्ये त्यांची उंची कमी असल्याने त्यांना नोकरीसाठी नाकारण्यात आले होते. परंतु एरोनॉटिकल पदवीनंतर अगदी सुषमा अभ्यासाच्या जोरावर मुलाखत मध्ये अनेक डिगऱ्या व पीएचडी असलेल्या नामांकित लोकांपेक्षा उत्कृष्ट मुलाखत देऊन विक्रम साराभाई यांच्या टीम मध्ये ते सहभागी झाले. वाचनासाठी आठ ते दहा किलोमीटर रेल्वे स्टेशनवर जाऊन आलेल्या पेपराचे वाचन व वाटप करीत. धर्म हा माणसे जोडणारा असला पाहिजे. सर्व संस्कृती आनंदात नांदल्या पाहिजे अशा विचाराचे ते होते. त्यांनी भारतातील तरुणांची शक्ती ओळखली होती. या शक्तीचा उपयोग घेऊन जगाचे लक्ष भारताकडे कायमचे वळले पाहिजे त्यासाठी त्यांनी देशाला उच्चतम बनण्याचे ध्येय दिले होते. अप्रतिम जिद्द असलेले व्यक्तिमत्व आयुष्यभर देशासाठी जगले. देशासाठी संसाराची चूल मांडली नाही. भारताला अस्त्रा मध्ये कोणतीच कमतरता अपुरी पडू नये म्हणून मिसाईल तयार केले. पोखरण नंतर त्यांनी दुसरी अणुचाचणी घडवून देश शक्तिशाली आहे असे जगाला दाखवून दिले. शिक्षणासाठी , देशाच्या उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या ह्या विद्वानाने स्वतःसाठी कोणतेही संपत्ती जमा केली नाही. एक बॅग घेऊन राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. पदावरुन जाताना केवळ एक बॅग त्यांची होती. असंख्य अडचणी पार करून आलेला संशोधक देशाची गरिमा वाढवून गेला. भारताचे स्वतःचे क्षेपणास्त्र तयार करून देशाला स्वावलंबी बनविले. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत मार्गदर्शन करीत राहिले.
शिलॉंग येथे भाषणासाठी गेले असता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.तो दिवस होता २७ जुलै १९१५ ला हृदयाचा अचानक झटका आल्याने झाला. त्यांनी विद्यार्थी व तरुणांना नेहमी प्रोत्साहन दिले. देशाच्या तरुण शक्तीचा योग्य वापर देशाला विकसित करू शकतो असे ते म्हणत असत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यामध्ये अग्निपंख हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी दशसुत्री दिलेली आहे. देशाचे स्तंभ उभी करण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते त्यासाठी देशाचा शिक्षक प्रामाणिक, नीतिमान, अभ्यासू, समतावादी, तार्किक, वैज्ञानिक दृष्टी असलेला असावा.यावर त्यांची भिस्त होती. देशाच्या व्यवस्थेला दिलेले विकसित राष्ट्राचे स्वप्न २०२० आम्ही पूर्ण करू शकलो नाही. शिक्षण महाग करून बहुजनांना शिक्षणापासून खूपच लांब घेऊन गेलेलो आहोत. शिक्षणामध्ये नैतिकता असावी या व त्यांचा जोर होता. शिक्षणासाठी स्पर्धा असावी परंतू मानवतेचा धागा असावा असे ते सांगत. डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे निमित्त त्यांना अभिवादन.
लेखक
पत्रकार
एस.एच.भवरे
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...