Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
खान्देश विशेष बातमी

बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राकडून जनजागृती उपक्रम*

ईश्वर रामदास महाजन 12 Oct 2026, 07:29 1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:41 5 min read
🔧 साधने:
बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राकडून जनजागृती उपक्रम*

*बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राकडून जनजागृती उपक्रम*

*अकोला (प्रतिनिधी)* जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज, अकोला येथे अमरावती येथील बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने मानसिक आरोग्यविषयक जाणीव व जागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजच्या संस्थापक वसुधा गडेकर तसेच या नर्सिंग कॉलेजच्या सेक्रेटरी अॕड. वैशाली वाळचाळे यांनी विशेष सहकार्य केले. प्राचार्य युवराज जी. टी. पाटील, प्राध्यापक अभिजीत भोयर सर,तसेच महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य युवराज जी. टी. पाटील यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व विशद केले, तर प्रा. अभिजीत भोयर यांनी मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

*मानसिक आरोग्य आणि पालकांच्या भूमिकेवर मार्गदर्शन*

बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या सौ. जया राघोर्ते यांनी मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, तणाव व नैराश्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच बदलत्या शिक्षणपद्धतीमध्ये पालकांची भूमिका आणि त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

केंद्राचा परिचय सौ. अश्विनी देशमुख यांनी करून दिला. तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी योग्य माहिती, पुनर्वसनाचे महत्त्व व गरज यावर मार्गदर्शन केले.मानसोपचार तज्ञ संघटना यांच्यामार्फत सुसाईड प्रीवेंशन वरील क्लिप सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. यामध्ये आत्महत्या करण्यामागच्या भावना, त्याला प्रवृत्त करणारी विचारधारा, तसेच आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना अशा विषयांवर अनेक डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

*प्रश्नमंजुषेतून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन*

कार्यक्रमाच्या शेवटी मानसिक आरोग्यविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य, मानसिक आजार आणि त्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेजमधील सर्व कर्मचारीवर्गाने सहकार्य केले. तसेच बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या टीममधील स्वप्निल वर्दे आणि अक्षय बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

मानसिक आजारांविषयी गैरसमज दूर करणे, मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना योग्य वेळी योग्य मदत व उपचार मिळण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपत्रकार आणि पत्रकारितेसाठी व्हॉइस ऑफ मीडियाने घडवलेली क्रांती जागतिक इतिहासाचा भाग : अनिल म्हस्के , महाराष्ट्रातील केडर कॅम्पच्या समारोपात संघटनात्मक कार्याचा गौरव; प्रामाणिकपणा, निर्मळता आणि पत्रकारितेच्या धर्माला सर्वोच्च प्राधान्य , राज्यातील ११ हज पुढील बातमी →जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती उपक्रम* *बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा सामाजिक उपक्रम*

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!