Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही मोलाचा वाटा – सुभाष अहिरे

ईश्वर रामदास महाजन 06 Oct 2026, 10:53 877 views अपडेटेड 18 Oct 2026, 05:53 5 min read
🔧 साधने:
राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही मोलाचा वाटा – सुभाष अहिरे

राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही मोलाचा वाटा – सुभाष अहिरे

अमळनेर प्रतिनिधी

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त विविध साहित्यिक व भाषिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या शृंखलेत मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मराठी कथाकथन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कथाकार सुभाष अहिरे यांनी आपल्या प्रभावी कथाकथनातून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी कथाकथन करताना सुभाष अहिरे म्हणाले, “राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मानवी मन घडविण्याचे, संवेदनशील बनविण्याचे आणि त्याच्या जगण्याला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे.” कथा ही माणसाच्या जीवनाशी, अनुभवांशी आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेली असल्याने तिच्या माध्यमातून जीवनमूल्ये, सामाजिक भान आणि मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त करता येतात, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या ओघवत्या आणि रसाळ कथाकथनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रभावी कथाकथनाने विद्यार्थ्यांना साहित्याच्या सर्जनशील आणि सामाजिक सामर्थ्याचा अनुभव मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षाचा आणि त्यामागील विविध प्रयत्नांचा आढावा घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा केवळ भाषेचा सन्मान नसून मराठी संस्कृती, साहित्य, परंपरा आणि भाषिक वारशाचा गौरव आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, साहित्याचा आस्वाद घ्यावा आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बडगुजर यांनी केले. डॉ. विलास गावित यांनी प्रमुख पाहुणे सुभाष अहिरे यांचा परिचय करून दिला. तर आभार प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले.

यावेळी मराठी विभागातील डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील आणि तुषार पाटील उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपक्षीमित्र जितेंद्र वाणी राज्यस्तरीय ‘निसर्ग मित्र आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित पुढील बातमी →स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत माझी यशोगाथा उपक्रम उत्साहात संपन्न.

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!