स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत माझी यशोगाथा उपक्रम उत्साहात संपन्न.

जळगांव प्रतिनिधी
जळगांवयेथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आज माझी यशोगाथा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात सुप्रसिद्ध नाट्यकलावंत डॉ.श्रद्धा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत वाचिक अभिनयासंदर्भात कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेच्या प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक डॉ.अतुल इंगळे यांनी डॉ.श्रद्धा पाटील यांचे नाट्य क्षेत्रातील योगदानाचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
सदर कार्यशाळेत प्रमुख वक्ता डॉ.श्रद्धा पाटील यांनी भाषा विषयाचे महत्त्व,शब्द, शब्दरचना, वाक्यातील स्वल्पविराम तसेच इतर अवतरण चिन्हे याविषयी मार्गदर्शन केले. तालव्य,दंतव्य अशा वेगवेगळ्या अक्षरांची आणि शब्दांची ओळख करून त्यानुसार विविध भाषांमधील त्या त्या शब्दांचे अर्थ कसे बदलतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्यांकडून सराव करवून घेतला. तसेच एकाच वाक्याला हास्य रस, रौद्र रस, करूण रस इत्यादी नवरसांच्या माध्यमातून कोणकोणत्या पद्धतीने बोलता येऊ शकते याचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केले. तसेच वाचा शुद्धीसाठी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करवून घेतले. डॉ.श्रद्धा पाटील यांनी यशस्वी व आनंदी जीवनासाठी कला आणि क्रीडा यांचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांना भाषा शुद्ध भाषिक उच्चारांचे महत्व विषद करताना कोणतेही एक कला अवगत असणे गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...