Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

पक्षीमित्र जितेंद्र वाणी राज्यस्तरीय ‘निसर्ग मित्र आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

ईश्वर रामदास महाजन 06 Oct 2026, 10:48 972 views अपडेटेड 18 Oct 2026, 09:26 4 min read
🔧 साधने:
पक्षीमित्र जितेंद्र वाणी राज्यस्तरीय ‘निसर्ग मित्र आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी विद्यामंदिराचे उपक्रमशील, कार्यतत्पर व आदर्श शिक्षक तथा पक्षीमित्र जितेंद्र वाणी सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘राज्यस्तरीय निसर्ग मित्र आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील पद्मालय सभागृहात ४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. नॅशनल ह्यूमन राइट्स अँड अँटी करप्शन सोशल जस्टिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते वाणी सरांचा गौरव करण्यात आला.

गेल्या २९ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षी व निसर्ग संवर्धन, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आपल्या कार्याप्रती असलेली सेवानिष्ठा, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता यांची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यास नाशिक विभागाचे शिक्षक आमदार दादासो. किशोर दराडे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी संचालक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासो. अशोक एस. पवार (मध्य प्रदेश), राज्याध्यक्ष दादासो. प्रफुल एस. पाटील, तसेच धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जितेंद्र वाणी सरांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे सर, सर्व कार्यकारी संचालक, मुख्याध्यापक संजीव पाटील सर, सहकारी शिक्षकवृंद तसेच मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शैक्षणिक कार्यासोबत निसर्ग व पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीयोगसेवेतील उल्लेखनीय योगदानासाठी ज्योती रामराव पाटील यांना राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार , आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगप्रसाराचे उल्लेखनीय कार्य पुढील बातमी →राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही मोलाचा वाटा – सुभाष अहिरे

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!