योगसेवेतील उल्लेखनीय योगदानासाठी ज्योती रामराव पाटील यांना राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार , आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगप्रसाराचे उल्लेखनीय कार्य

अमळनेर प्रतिनिधी : समाजासाठी उल्लेखनीय कार्य व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी National Human Rights & Anti Corruption Social Justice Foundation अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन यांच्या वतीने सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आरोग्यम योगा सेंटर, अमळनेरच्या योग शिक्षिका ज्योती रामराव पाटील यांना ‘समाज भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.
योगाच्या माध्यमातून समाजामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचारसरणी आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी ज्योती पाटील सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या योगसेवेची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.
ज्योती पाटील यांनी योगविद्या धाम गुरुकुल, नाशिक येथे प्रशिक्षण घेतले असून, त्यांना डॉ. विश्वासराव मांडलिक गुरुजी यांचे मार्गदर्शन व संस्कार लाभले आहेत. योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान आत्मसात केल्यानंतर त्यांनी अमळनेर येथे योगाचे वर्ग सुरू करून अनेक साधकांपर्यंत योग पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.
योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन, श्वास आणि जीवनशैली यांच्यात समतोल साधणारी जीवनपद्धती आहे, या विचारातून त्यांचे कार्य सुरू आहे. योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, योगनिद्रा तसेच आरोग्यदायी आहार-विहार आणि जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करून त्या नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
‘हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी’
‘समाज भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्योती रामराव पाटील यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान केवळ माझ्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून माझ्यासोबत योगाच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकाचा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणभावाने योगसेवा व समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
या यशामागे गुरुजन, कुटुंबीय, योगसाधक, मित्र-मैत्रिणी तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. National Human Rights & Anti Corruption Social Justice Foundation तसेच पुरस्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...