Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
क्रीडा विशेष बातमी

विभागीय कुस्ती स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाचा दबदबा! कृष्णा महाजन व प्रथम पाटील यांची विभागस्तरावर सुवर्ण कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ईश्वर रामदास महाजन 05 Oct 2026, 01:52 1.3K views अपडेटेड 22 Oct 2026, 10:26 3 min read
🔧 साधने:
विभागीय कुस्ती स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाचा दबदबा!    कृष्णा महाजन व प्रथम पाटील यांची विभागस्तरावर सुवर्ण कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

धरणगाव प्रतिनिधी(किरण चव्हाण)

: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने येवला, जि. नाशिक येथील क्रीडा संकुलात विभागीय शालेय फ्रीस्टाइल कुस्ती व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगावच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विभागीय विजेतेपदावर आपले नाव कोरले.

इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील कृष्णा गोरख महाजन याने १९ वर्षांखालील ८६ किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच प्रथम गोविंदा पाटील याने ग्रीको-रोमन कुस्तीच्या ९६ किलो वजनी गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट डावपेच, ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे कृष्णा महाजन व प्रथम पाटील यांची राज्यस्तरीय शालेय फ्रीस्टाइल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या दोन्ही खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक डी. एन. पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, संचालक अश्विनकुमार पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, उपमुख्याध्यापक ए. एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृष्णा महाजन, प्रथम पाटील आणि प्रशिक्षक डी. एन. पाटील यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

फोटो कँप्शन

पै प्रथम गोविंदा पाटील

97kg ग्रीको रोमन

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीआंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा ५ ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन !! पुढील बातमी →अंधारातील दीपस्तंभांची कहाणी शब्दबद्ध करणारे ‘उजेड पेरणारी माणसं’ बुधवारी प्रकाशात

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!