आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा ५ ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन !!
.png)
प्राचीन काळापासून शिक्षकाला अनमोल असे महत्व आहे. आई-वडिलांनंतर मुलाला योग्य संस्कार लावण्याचे कार्य शिक्षक करीत असतो. प्राचीन काळामध्ये शिक्षकांचे काम करणारा व्यक्ती गुरु म्हणून ओळखला जात होता. त्या काळातील मुख्याध्यापक म्हणजे आचार्य होता. वैदिक काळात सर्वांसाठी शिक्षण खुले नव्हते. गुरुकुलात शिक्षण राजांच्या मुलांना म्हणजे राजपूत यांना शिक्षण दिले जात होते. विदेशामध्येही विविध मिशनरी संस्था शिक्षण देत होते. या देशात वर्णद्वेष होता त्या देशात काळया लोकांना शिक्षण दिले जात नव्हते. त्यांच्यामध्ये शिक्षण घेऊन शिक्षक निर्माण झाले आणि काळया लोकांसाठी शिक्षण सुरू झाले. भारत देशात मात्र बरेच वर्ष बहुजनांसाठी शिक्षण नव्हते. फ्रेंच क्रांती झाली आणि जगामध्ये प्रबोधनाचे वारे वाहू लागले. भारत देशामध्ये लोकायत चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर वर्धमान, चक्रधर यासारख्या लोकांनी स्त्री पुरुष समानतेला महत्व दिले. खऱ्या अर्थाने भारतामध्ये महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षण खुले करण्यासाठी हंटर कमिशन समोर आपली दाद मागितली. त्यामुळे प्राथमिक शिक्षण १ते १४ वयाच्या मुलांसाठी खुले झाले. महात्मा फुले हे भागातील बहुजनांसाठी शिक्षण खुले करणारे पहिले महर्षी आहेत. आपल्या देशातील बहुजनांचे पहिले शाळा संस्थापक आहे. सावित्रीबाई फुले पहिल्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका आहेत. भारतामध्ये अनेक संस्था होत्या परंतु त्या स्वतःच्या जातीसाठी शिक्षण देणाऱ्या होत्या. जगात सर्वप्रथम चीनमध्ये शिक्षणाला शिया राजघवंश व इजिप्त मध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात सुरू झाले. भारतामध्ये तक्षशिला नावाचे विद्यापीठ प्राचीन मानले जाते. नालंदा या विद्यापीठात खूप मोठी ग्रंथ संपदा होती. भारतातील विद्यापीठात सर्व धर्माचा अभ्यास केला जात होता. वैज्ञानिक विचार यापूर्वी मध्ये रुजला. देवापेक्षा जिवंत माणूस आला महत्व दिले गेले.आज आधुनिक युगात विदेशामध्ये शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतामध्ये मात्र तो सरकारी यंत्रणेचा गुलाम झालेला आहे. त्याचे शिक्षणाचे कार्य सोडून दुसरेच कार्य त्याला करावे लागत आहे. भोजनाच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राजसत्तेच्या जोरावर न्यायालय शिक्षकाला ताणून ठेवत आहे. या शिक्षकांना एमपीएससी व यूपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी घडविले त्यालाच आता परीक्षा द्यावी लागत आहे. भारतामध्ये केवळ शिक्षकासाठी परीक्षा आहे. परीक्षा देणे वाईट नाही. परंतु शिक्षकापेक्षा देशाची महत्वाची धुरा ज्यांच्याकडे आहे यांना परीक्षा का नाही असा प्रश्न विचारवंत विचार येत आहे. जो देशाचा कारभार चालवितो त्याला देश कसा चालवायचा याबाबत कोणतीच अट नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना एकदा न्यायाधीश झाल्यावर पुन्हा परीक्षा नाही. शिक्षक ही व्यवस्था कोलमडून टाकण्यासाठी जाचक नियम लागले जात आहे. स्वीडन सारख्या देशाने लहान बालकांना मोबाईल पासून तसेच टॅब पासून अलिप्त करण्यासाठी मोठा मोर्चा काढून निषेध करून मोबाईलचा वापर टाळला. एस.आय मुळे मुले बौद्धिक विचार करीत नव्हते. त्यामुळे उत्तम निर्णय त्यांनी घेतला. फिनलँड मध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण व्यवस्था आहे. जागतिक शिक्षक दिनाचा यंदाचा विषय आहे शिक्षक सुरक्षितता आणि शिक्षकांचा उचित सन्मान. परंतु भारतामध्ये शिक्षकाला शिकवण्याच्या कामापासून दूर ठेवले जात आहे. देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार असताना शिक्षकांचा शासकीय कामे करण्यासाठी बळी दिला जात आहे. भारतातील शिक्षण संचालक संस्था उभारून पैसा कमवित आहे. सेवाभाव वृत्ती त्याच्यामध्ये दिसून येत नाही. त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षकाला गुलाम म्हणून वापरले जाते. आज जागतिक शिक्षक दिवस असल्याने शिक्षकाच्या बाबतीत योग्य सुरक्षितता देण्याची गरज आहे. युनेस्को व आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांनी १९६६ मध्ये जागतिक शिक्षक दिनाच्या शिफारशी केल्या. त्यामुळे जगामध्ये १०० देशामध्ये जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. जगात चीनच्या कन्फ्युसिअस यांना जगातील पहिला खाजगी शिक्षक म्हणून मान दिला जातो. ग्रीक देशातील सॉक्रेटिस व ॲरिस्टॉटल यांना अधिकृत शिक्षक मान्यता देण्यात आलेली आहे.युनेस्को तर्फे १९९४ पासून हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा..
लेखक
पत्रकार
एस.एच.भवरे
९०७५४१७०३२
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...