Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

अंधारातील दीपस्तंभांची कहाणी शब्दबद्ध करणारे ‘उजेड पेरणारी माणसं’ बुधवारी प्रकाशात

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; खान्देशातील ८४ कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा वेध
ईश्वर रामदास महाजन 05 Oct 2026, 04:20 964 views अपडेटेड 25 Oct 2026, 04:43 5 min read
🔧 साधने:
अंधारातील दीपस्तंभांची कहाणी शब्दबद्ध करणारे ‘उजेड पेरणारी माणसं’ बुधवारी प्रकाशात
थोडक्यातराज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; खान्देशातील ८४ कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा वेध

जळगाव प्रतिनिधी :

समाजाच्या वाटचालीत स्वतःच्या कर्तृत्वाने प्रकाशाची वाट निर्माण करणाऱ्या माणसांची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘उजेड पेरणारी माणसं’ या ललित व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातून करण्यात आले आहे. भुसावळ येथील लेखक आनंदा पाटील यांच्या या पुस्तकाची निर्मिती पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने केली असून, पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी जळगावात रंगणार आहे.

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथील मराठी भाषा विभाग आणि प्रगतिशील लेखक संघ, उत्तर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने हा साहित्यिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता महाविद्यालयातील धांडे सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे उपस्थित राहतील. प्रगतिशील लेखक संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक डॉ. मिलिंद बागूल तसेच उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

खान्देशातील कर्तृत्वाला शब्दांचा उजेड

‘उजेड पेरणारी माणसं’ हे केवळ व्यक्तिचित्रणांचे पुस्तक नसून, आपल्या अवतीभोवती कार्यरत असलेल्या अनेक उपेक्षित आणि दुर्लक्षित दीपस्तंभांचा साहित्यिक मागोवा घेणारा दस्तऐवज ठरतो. वामनदादा कर्डक यांचा वैचारिक वारसा पुढे नेणारे भीमशाहीर प्रतापसिंगदादा बोदडे, आंबेडकरी चळवळीला समृद्ध करणारे दिलीप घोडेस्वार, देश-विदेशातील ज्येष्ठांच्या स्पर्धांमध्ये आपल्या धावण्याने ठसा उमटविणारे आर. बी. भवार, आंतरराष्ट्रीय चित्रकार पिसूर्वो आणि साहित्यशास्त्री तेजपाल चौधरी यांच्यासह खान्देशातील तब्बल ८४ व्यक्तिमत्त्वांचा या पुस्तकातून वेध घेण्यात आला आहे.

या व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षाची, ध्यासाची, कर्तृत्वाची आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची शब्दचित्रे वाचकांसमोर उभी राहत असल्याने पुस्तकाला वेगळी साहित्यिक उंची प्राप्त झाली आहे.

पहिली आवृत्ती २८ दिवसांत संपली

‘उजेड पेरणारी माणसं’च्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या २८ दिवसांत पहिली आवृत्ती संपल्याने या पुस्तकाच्या लोकप्रियतेची प्रचिती आली. आता बुधवारी द्वितीय आवृत्ती वाचकांच्या भेटीला येत आहे.

महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक तसेच परदेशातही हे पुस्तक पोहोचले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये या पुस्तकाच्या सामूहिक रसग्रहणाचे उपक्रमही होत आहेत.

ज्या माणसांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाच्या वाटेवर उजेड पेरला, त्यांच्या जीवनप्रवासाला साहित्याच्या शब्दांत जपणारे हे पुस्तक म्हणजे खान्देशच्या मातीतील कर्तृत्वाचा संवेदनशील दस्तऐवज ठरला आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीविभागीय कुस्ती स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाचा दबदबा! कृष्णा महाजन व प्रथम पाटील यांची विभागस्तरावर सुवर्ण कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पुढील बातमी →जिल्हा पिंजून काढत धनगर समाज कर्मचारी संघटनेची संघटनात्मक मोहीम! ,जिल्हाध्यक्ष तुळशीराम सोनवणे यांच्या तालुकानिहाय दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुक्ताईनगर-बोदवड व जामनेरमध्ये संघटनेची मजबूत बांधणी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!