Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश ब्रेकिंग न्यूज

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भविष्यातील पाणी, चारा परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच उपायोजना करण्याच्या सूचना- ,शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसीचे निर्देश
ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 12:41 1.2K views अपडेटेड 22 Oct 2026, 18:48 8 min read
🔧 साधने:
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी-  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
थोडक्यातभविष्यातील पाणी, चारा परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच उपायोजना करण्याच्या सूचना- ,शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसीचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी

दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी असे निर्देश देत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि शेतकरी यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणी तत्परतेने सोडवाव्यात नागरिकांची व शेतकऱ्यांची अनावश्यक अडवणूक करू नये असे निर्देश संबंधितांना दिलेत.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आज आयोजित बैठकीत महसूल मंत्री श्री बावनकुळे बोलत होते.

यावेळी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण तसेच कृषीपंपांना वीजजोडणी देताना, बँका आणि महावितरणे कोणतीही टाळाटाळ करू नये. शेतकऱ्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वारंवार कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना वेठीस धरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

*शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी करा-*

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या घरी जाऊन तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबवून एकही पात्र शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह वीज केबल चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आणि महावितरणने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुख्यालयी अनुपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि गतिमान पद्धतीने काम करावे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तत्पर सेवा देण्याचे निर्देश श्री बावनकुळे यांनी दिले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी, जिल्ह्यात होणाऱ्या वीजतार चोरी संदर्भात समस्या मांडली. पालकमंत्री श्री पाटील यांनी यावेळी जिल्ह्यात, विविध योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगती संदर्भात माहिती सांगून ते म्हणाले जिल्ह्यात सध्या स्थितीला योग्य समन्वयाने काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. तसेच विज चोरी संदर्भात पोलिसांमार्फत झालेल्या कारवाईची माहिती दिली.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा होईल या दृष्टीने महावितरण विभागाने दक्षता घ्यावी, चारा उपलब्ध होईल अशा प्रकारची पिके शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घ्यावीत. वनविभागाने सुद्धा या संदर्भात नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.

बैठकीत, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मतदार संघातील आवश्यक उपयोजना संदर्भात सूचना मांडल्या.

बैठकीच्या सुरुवातीला महसूल मंत्री श्री बावनकुळे, यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची विविध समस्यांची निवेदने स्वीकारली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी, प्रास्ताविकात पर्जन्यमान, पीक स्थिती, जलसाठा, पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता बाबत सद्यस्थितीची माहिती दिली तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले.

बैठकीला, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, पोलीस,आरोग्य यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीनांद्री विकास मंचची प्रेरणादायी वाटचाल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप पुढील बातमी →महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद, पातरखेडे येथे केली पिकांची पाहणी अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!