Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी , सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण; तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 09:37 992 views अपडेटेड 24 Oct 2026, 14:33 5 min read
🔧 साधने:
अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी  ,  सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण; तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुका काँग्रेसच्या वतीने विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुभाष चौक, अमळनेर येथील श्री. लोटन अण्णा चौधरी यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री. भागवत गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, त्याग आणि समानतेच्या विचारांवर भाष्य केले. गांधीजींच्या विचारांचा आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीच्या संदर्भात विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले.

यानंतर जिल्हा पदाधिकारी ॲड. रज्जाक शेख यांनी ‘सर्वधर्मसमभाव, सद्भाव आणि आजची देशातील राजकीय परिस्थिती’ या विषयावर आपले विचार मांडले. विविध समाजघटकांमध्ये सामाजिक सलोखा आणि परस्पर सद्भाव टिकविण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

ओबीसीचे जिल्हा पदाधिकारी श्री. मनोज पाटील यांनी महात्मा गांधींच्या राजकीय व सामाजिक विचारांचा संदर्भ देत, वंचित, पीडित आणि तळागाळातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहताना गांधी विचारांचे महत्त्व असल्याचे प्रतिपादन केले.

गांधी विचार आणि विविध राष्ट्रीय नेत्यांच्या भूमिकांवर चर्चा

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. भागवत सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार, श्री. गोळवलकर गुरुजी तसेच वीर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा संदर्भ घेत महात्मा गांधी यांच्या विचारांशी त्यांची तुलनात्मक मांडणी केली. विविध राष्ट्रीय नेत्यांच्या विचारधारांचा ऐतिहासिक संदर्भातून अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून मांडले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. डी. एम. पाटील यांनी काँग्रेसपुरते मर्यादित न राहता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून काम करण्याचे आवाहन केले.

यानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.

ताराचंद नाना सूर्यवंशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. ताराचंद नाना सूर्यवंशी यांचा वाढदिवस असल्याने उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास श्री. लोटन अण्णा चौधरी, सईद तेली, राजेंद्र चौधरी सर, पी. वाय. पाटील, डॉ. रवींद्र पाटील, भिकाजी पाटील, शरद पाटील, राजू भाट, दिनेश पवार, एस. सी. तेले सर, मयूर पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार श्री. गजेंद्र साळुंखे यांनी मानले. उपस्थितांचे आभार व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीचोऱ्यांना आळा घालण्यासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दल उभारा! ,पोलीस पाटलांना डीवायएसपी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन; नवरात्रोत्सवात दक्ष राहण्याच्या सूचना पुढील बातमी →सेवा संकल्प अभियान अंतर्गत पथनाट्य सादरीकरण शिक्षण विभाग पाचोरा यांचा उपक्रम

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!