Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दल उभारा! ,पोलीस पाटलांना डीवायएसपी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन; नवरात्रोत्सवात दक्ष राहण्याच्या सूचना

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 09:18 997 views अपडेटेड 20 Oct 2026, 13:05 6 min read
🔧 साधने:
चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दल उभारा!    ,पोलीस पाटलांना डीवायएसपी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन; नवरात्रोत्सवात दक्ष राहण्याच्या सूचना

शिंदखेडा प्रतिनिधी :

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून पोलीस पाटलांनी अधिक दक्षतेने काम करावे, असे आवाहन शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.

शिंदखेडा पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता वार्षिक तपासणीच्या निमित्ताने पोलीस पाटलांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना डीवायएसपी सुधीर पाटील यांनी विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या.

नवरात्रोत्सव काळात शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीतील पाटण येथील आशापुरी, साळवे येथील पेडकाई, जोगशेलू, विधासणी, सोनशेलू येथील चामुंडा तसेच दरणे व रोहाणे येथील धनदाई या जागृत देवस्थानांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस पाटलांनी पोलीस विभागाला सहकार्य करून बंदोबस्तात मदत करावी, असे त्यांनी सांगितले.

गावांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त मंडळांकडून नवदुर्गेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत असल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याची आवश्यक परवानगी घ्यावी, याबाबत पोलीस पाटलांनी त्यांना सूचना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेरीवाल्यांची माहिती नोंदविण्याच्या सूचना

सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावात येणाऱ्या बाहेरील फेरीवाल्यांची चौकशी करून त्यांचा आधारकार्ड क्रमांक, छायाचित्र व आवश्यक माहिती रजिस्टरमध्ये नोंदवावी, अशा सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्या.

गावांमध्ये शेळ्या, गुरे, पाण्याच्या मोटारी, दुचाकी, ट्रॅक्टर, शेतीची अवजारे तसेच कापूस चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची प्रभावी मदत घ्यावी. गावात कोणतीही अनोळखी किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना सोबत घेऊन पोलीस पाटलांनी आळीपाळीने गावात गस्त घालावी. तसेच पोलीस पाटलांनी आपले काम निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करावे, असेही सुधीर पाटील यांनी सांगितले.

‘गावात दक्ष राहा, संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना द्या’

प्रभारी पोलीस निरीक्षक मयूर भांमरे यांनीही पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. येणारा काळ आव्हानात्मक असून, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी गावात दक्ष राहून ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने प्रभावीपणे काम करावे. संशयित व्यक्ती आढळल्यास विलंब न करता पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी एपीआय ढाकणे, पीएसआय माया राजपूत, अनंत पवार, हेमंत फुलपगारे, चेतन माळी, हेमराज जाधव यांच्यासह शिंदखेडा विभागातील पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :

शिक्षित तरुणांना ग्रामसुरक्षा दलात संधी

गावातील सुशिक्षित तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसलेल्या तरुणांचा ग्रामसुरक्षा दलात समावेश करावा. प्रत्येक गावात असे दल स्थापन केल्यास रात्रीच्या गस्तीवेळी पोलीस पाटलांना मोठी मदत मिळेल. ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना पोलीस विभागाकडून ओळखपत्र व टी-शर्ट देण्यात येणार असल्याचे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीप्रताप' मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पुढील बातमी →अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी , सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण; तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!