रक्षाबंधनानिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात पर्यावरणपूरक राखी निर्मिती
![]()
रक्षाबंधनानिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात पर्यावरणपूरक राखी निर्मिती
जळगाव दि२७/०८/२०२६: रक्षाबंधनाच्या निमित्ताने के.सी.ई. सोसायटी जळगाव संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये बहीण-भावाच्या पवित्र नात्याबद्दल प्रेम व आपुलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून त्यांना कार्यानुभव प्राप्त व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘माझी बहीण, माझा अभिमान’ ही प्रतिज्ञा घेतली. तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक राखी निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून सर्जनशीलतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
राखी निर्मिती स्पर्धेत इयत्ता पाचवीमध्ये आराध्या गणेश पाटील हिने प्रथम, नव्या रुपेश बोंडे हिने द्वितीय, तर पलक संदीप चौधरी हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता सहावीमध्ये दिया प्रवीण दहिभाते प्रथम, अनुश्री अनिल चौधरी द्वितीय, तर आरुषी गणेश आदमने तृतीय आली. इयत्ता सातवीमध्ये मनाली पाटील प्रथम, वैष्णवी पाटील द्वितीय, तर अनुष्का प्रविण वाघरी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच इयत्ता पाचवी ते सातवीसाठी घेण्यात आलेल्या रक्षाबंधन विषयक निबंध स्पर्धेत सोहाली गोपाळ चौधरी हिने प्रथम, रूद्राणी चारू दत्ता पाटील हिने द्वितीय, तर स्वराज्यसिंग प्रविण पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला.
या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती प्रतिभा लोहार, श्रीमती सुचिता बाविस्कर, श्रीमती रत्नमाला शिंदे, श्रीमती रोशनी कोळी, श्रीमती भक्ती बर्वे, श्रीमती शितल कोल्हे तसेच श्री तडवी सर यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रक्षाबंधनाचा हा उपक्रम आनंददायी व संस्कारक्षम ठरला.

