डॉ. डिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडीचा सन्मान; AK फाउंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार,  सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव; शाल, श्रीफळ, रोप व भेटवस्तू देऊन केला सन्मान
1 min read

डॉ. डिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडीचा सन्मान; AK फाउंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव; शाल, श्रीफळ, रोप व भेटवस्तू देऊन केला सन्मान

Loading

डॉ. डिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडीचा सन्मान; AK फाउंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव; शाल, श्रीफळ, रोप व भेटवस्तू देऊन केला सन्मान

अमळनेर प्रतिनिधी : पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे तथा मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे ७४ देशांमध्ये कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल AK फाउंडेशनच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह संस्थानच्या सभागृहात हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

डॉ. महाले यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीचा गौरव करताना AK फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. शिक्षक, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, पत्रकार तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी बजावलेल्या जबाबदाऱ्या आणि केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

विशेषतः मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजना यांचेही कौतुक करण्यात आले. डॉ. महाले यांच्या नेतृत्वातून अनेकांना प्रेरणा मिळत असून, त्यांच्या हातून भविष्यातही समाजहिताची अशीच विधायक कामे घडत राहावीत, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.

AK फाउंडेशनच्या अध्यक्षा नयनाताई कुलकर्णी आणि ज्येष्ठ सल्लागार डॉ. उदयकुमार खैरनार यांच्या हस्ते डॉ. महाले यांचा शाल, श्रीफळ, रोप व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारातून अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते’

सत्काराला उत्तर देताना डॉ. दिगंबर महाले यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय परमेश्वराला देत, “आपले कर्म चांगले असेल तर परमेश्वर प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश देतो,” असे प्रतिपादन केले. आपल्या कार्यप्रवासातील विविध अनुभव आणि उदाहरणे सांगत त्यांनी आतापर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. आगामी काळातील काही नाविन्यपूर्ण योजनांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

AK फाउंडेशनने केलेला हा सन्मान आपल्याला भविष्यात अधिक जोमाने समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देणारा आहे, असे सांगत त्यांनी फाउंडेशनच्या आगामी सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

१७-१८ वर्षांपासून AK फाउंडेशनचा सामाजिक प्रवास

यावेळी ज्येष्ठ सल्लागार डॉ. उदयकुमार खैरनार यांनी AK फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. सुमारे १७-१८ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात फाउंडेशन विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच अमळनेर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील महानाट्याचे आयोजन केल्याची माहितीही त्यांनी दिली.

फाउंडेशनच्या आगामी उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाले सरांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजेंद्र पाटील यांनी डॉ. महाले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. डॉ. महाले हे केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी डॉ. महाले यांच्या नेतृत्वाची तुलना सक्षम कर्णधाराशी केली. “कॅप्टन सक्षम असेल तर संपूर्ण टीमला दिशा मिळते,” या शब्दांत त्यांनी महाले यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले.

डॉ. महाले यांच्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतील राष्ट्रीय जबाबदारीमुळे अमळनेरसह परिसराचा गौरव वाढला असून, ते आपल्या संघटन कौशल्यातून या जबाबदारीला निश्चितच न्याय देतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

फाउंडेशनच्या कार्याला नवी दिशा देण्याचा संकल्प

AK फाउंडेशनच्या अध्यक्षा नयनाताई कुलकर्णी यांनीही आपल्या मनोगतात फाउंडेशनच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मचारी, हितचिंतक आणि फाउंडेशनचे सुमारे १५ सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले, तर मयूर चौधरी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची सांगता “धर्म, संस्कृती, समाजसेवा—AK फाउंडेशनची हीच सेवा!” या घोषणेने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *