चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !…  पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !…  मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण !  बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
1 min read

चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !… मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण ! बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

Loading

चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !…

पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !…

मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण !

बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

चाळीसगाव प्रतिनिधी – (प्रा. पंकज पाटील)

चाळीसगांव – चाळीसगाव शहरातील टाकळी प्र चा सप्तशृंगी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम पांडुरंग बोरसे व ज्ञानेश्वर पांडुरंग बोरसे यांच्या मातोश्री निसर्गवासी रुख्माबाई पांडुरंग बोरसे यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने पार पडला. सर्वप्रथम संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक समाजाची प्रार्थना सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे यांनी म्हटली.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी क्रांतीसूर्याचे सामाजिक शैक्षणिक कार्य विशद करून शोषणमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होऊन सत्यशोधक विचारांनी मार्गक्रमण करावे. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. हीच खरी तात्यासाहेब महात्मा फुले व सावित्रीमाई यांना आदरांजली असेल असे प्रतिपादन पाटील यांनी केले. सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सत्यशोधक पद्धतीने विधी करावेत. रोकडे यांनी संपूर्ण परिवाराला एकसंघ राहण्याची शपथ दिली. सत्यशोधक समाजाचे तालुकाध्यक्ष भगवान बोरसे यांनी आपल्या मनोगतात संतांचे व महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी सर्व मित्रांना व उपस्थित नातलगांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले यानंतर परिवाराच्या माध्यमातून पाच वृक्षांचे रोपण ( आंबा , चिंच , निम , वड , पिंपळ ) आईच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य जगन्नाथ धोंडू महाजन, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज पाटील,भिकन बोरसे, सर्जेराव बोरसे, तुकाराम बोरसे, रघुनाथ बोरसे, भगवान देवरे, पांडुरंग देवरे, भगवान महाजन, रावसाहेब पाटील, अनिल पाटील, सहादू बोरसे , प्रवीण बोरसे, रमेश बोरसे, भालेराव माळी, विठ्ठल महाजन, धनराज वैराळे, अजय महाजन, रामदास महाजन, शोभाताई रानडे कीर्तनकार, शरद महाजन, ईश्वर बोरसे, भालचंद्र महाजन, रमेश सोनवणे, गणेश बोरसे , देवेंद्र बोरसे समस्त बोरसे परिवार दस्केबर्डी आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार यासह गाव व शहरातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *