सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला उपक्रमास प्रारंभ
![]()
सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला उपक्रमास प्रारंभ
अमळनेर प्रतिनिधी : सार्वजनिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या विचारांना उजाळा देणाऱ्या प्रेरणादायी कथा सादर केल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता दहावी ‘क’ वर्गातील आरजू पिंजारी हिने ‘काट्यांपासून बचाव’ ही कथा, तर लक्ष्मी जयकर हिने ‘साने गुरुजी आणि गरीब मुलगा’ ही कथा प्रभावीपणे सांगितली. गोपाळ महाजन यांनी मेहनतीतून मिळालेल्या पैशांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष अनिल जी. महाजन यांनी अध्यक्षीय मनोगतातून साने गुरुजींच्या जीवनातील विविध संस्कारक्षम आणि प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
यावेळी पर्यवेक्षक लालसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगिनी महाजन यांनी केले, तर भावना चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
साने गुरुजींच्या कथा, विचार आणि संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, संस्कारमूल्ये आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

