फरार आरोपी रामदास झोळ याचा फास अजून आवळला;* *भोंदू मनोहर मामा प्रकरणाचे धागेदोरे दत्तकला संस्थेपर्यंत.*  *पोलीस प्रकरणात धक्कादायक खुलासे उघड?*  *आरोपी रामदास झोळ अजूनही फरार*
1 min read

फरार आरोपी रामदास झोळ याचा फास अजून आवळला;* *भोंदू मनोहर मामा प्रकरणाचे धागेदोरे दत्तकला संस्थेपर्यंत.* *पोलीस प्रकरणात धक्कादायक खुलासे उघड?* *आरोपी रामदास झोळ अजूनही फरार*

Loading

*फरार आरोपी रामदास झोळ याचा फास अजून आवळला;*
*भोंदू मनोहर मामा प्रकरणाचे धागेदोरे दत्तकला संस्थेपर्यंत.*

*पोलीस प्रकरणात धक्कादायक खुलासे उघड?*

*आरोपी रामदास झोळ अजूनही फरार*

*कुर्डुवाडी, भिगवण : राज्यभर गाजलेल्या भोंदूबाबा मनोहर उर्फ ‘मामा’ चंद्रकांत भोसले याच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचल्याचे कुर्डुवाडी पोलिस तपासातून समोर आले आहे. या व्यवहारांमध्ये संस्थेचा वापर झाल्याचे पुढे आले आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रामदास झोळ यांच्याशी संबंधित बाबींचीही चौकशीला वेग घेतला असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भोंदूबाबांच्या मुसक्या आवळा, असे फर्मान काढल्यामुळे, अशा कार्यवाही वेगाने होत आहेत.* या मोहिमेमुळे मुख्यमंत्र्यांचे जनतेतून कौतुक होत आहे.
*या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत एकूण २३ आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे. अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा, बलात्कार, फसवणुकीच्या आरोपांपासून सुरू झालेल्या या तपासात आता आर्थिक व्यवहारांचाही महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे.*

*पोलिसांच्या तपासानुसार, मनोहर उर्फ ‘मामा’ भोसले याच्यामार्फत मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.*

*या आरोपांमुळे दत्तकला शिक्षण संस्थेचे आर्थिक व्यवहार, संस्थेतील नोंदी आणि संबंधित व्यक्तींमधील व्यवहार पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. या व्यवहारांचे नेमके स्वरूप काय होते, पैसा कोणाकडून आला, तो कोणत्या माध्यमातून संस्थेशी संबंधित झाला आणि त्याची पुढे कशी विल्हेवाट लावण्यात आली, याचा तपास सुरू असल्याचे समजते.*

*तपासादरम्यान दत्तकला शिक्षण संस्थेत या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे रजिस्टर, संगणक तसेच इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. या साहित्यामध्ये आर्थिक व्यवहार, संस्थेतील नोंदी किंवा संबंधित व्यक्तींमधील संपर्काबाबत काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.*

*पोलिसांच्या हाती आलेल्या कागदपत्रांमधून आणि डिजिटल साहित्यामधून या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी समोर येत आहे.*

*या तपासाच्या पार्श्वभूमीवर संस्थेशी संबंधित राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.*

*या दोघांची चौकशी करताना आर्थिक व्यवहारांबाबत तसेच भोंदूबाबा मनोहर उर्फ ‘मामा’ भोसले आणि संस्थेशी संबंधित व्यक्तींमधील संबंधांबाबत अधिकचा तपास यंत्रणेकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.*

*दरम्यान, दत्तकला संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रामदास झोळ यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.*

*सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तपास पुढे जात असताना आणखी महत्त्वाच्या आणि धक्कादायक बाबी समोर येत असल्याचे सांगितले.*

*आतापर्यंत निष्पन्न झालेल्या आरोपींची संख्या, झालेल्या अटक आणि जप्त करण्यात आलेले साहित्य पाहता या प्रकरणाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.*

*दरम्यान, संबंधित संस्थेत यापूर्वीही काही धक्कादायक प्रकार घडल्याच्या चर्चा असून, त्या घटनांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.*

*सध्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच संस्थेतील मागील घटनांची स्वतंत्रपणे चौकशी केल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.*

*दरम्यान, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल गड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.*

*कुर्डुवाडीतील अनिष्ट व अघोरी प्रथा प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा असतानाही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेली कारवाई उल्लेखनीय ठरली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाची स्थापना करत तपासाला योग्य दिशा देण्यात आली. तपासाची व्याप्ती केवळ मूळ गुन्ह्यापुरती मर्यादित न ठेवता त्यामागील कथित आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्ती आणि संस्थांपर्यंत तपासाची पाळेमुळे पोहोचवण्यात पोलिसांना यश आले आहे.*

*या तपासात आतापर्यंत २३ आरोपी निष्पन्न होणे आणि त्यापैकी १० आरोपींना अटक होणे, तसेच महत्त्वाचे दस्तऐवज, रजिस्टर, संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात येणे, ही पोलिसांच्या तपासाची महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. विशेष म्हणजे, तपास पुढे नेताना कथित आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे दत्तकला शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.*
*अधिकचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड हे करीत आहेत.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *