संतदास उपाख्य “ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराषज हिंगणकर यांना, राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६”
1 min read

संतदास उपाख्य “ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराषज हिंगणकर यांना, राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६”

Loading

संतदास उपाख्य “ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराषज हिंगणकर यांना, राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६”

अभंगकार ह भ प संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर
यांची साहित्यातील संस्कृत, हिंदी व मराठी असे त्रिवेणी संगमातील साहित्यिक योगदान पाहून संत वृत्तीला शोभणारा असा
*”राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज गौरव पुरस्कार २०२६”* हा येत्या २३/८/२०२६ रोजी के एस आय पब्लिकेशन कोल्हापूर यां संस्थे द्वारा आळंदी देवाची येथे काव्य संमेलनात दिग्गज साहित्यिक के एस आय पब्लिकेशन चे अध्यक्ष श्री विलास पाटील इंगळीकरसह इतर दिगज साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते दिला जाणारा हा सन्मान मोठ्या थाटात पार पडणार आहे. त्यांच्या चाहत्यांचे फोनवर आणि सोशल मीडियावर अगदी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराजांची स्वतः कीर्तनकार प्रवाचणकार असून अतिशय हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेऊन हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेष ऋषिकेश हरिद्वार येथेही संस्कृत चे पानिनी व्याकरण शास्त्राचा गाढा अभ्यास केला आहे.आज पर्यंत वारकरी सांप्रदायची परंपरा राखत अनेक अभंग,गौळणी, संस्कृत सुभाषिते व सामाजिक विश्वाची जाण ठेवून बरेच लिखाण केले आहे त्यांची वासुदेव पासष्टी, अभंग निर्झर भाग १, अभंग निर्झर भाग २ व येत्या २३ ऑगष्ट रोजी प्रसिद्ध होणारा संस्कृत ग्रंथ सुभाषित मकरंद अशी ग्रंथ संपदा असून त्यांची शोषल मीडियावर अनेक अभंग, गौळणी,संस्कृत सुभाषिते प्रसिद्ध आहेत त्यांनी आपल्या साहित्याततून त्यांनी जगाला संत साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *