गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन,  स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.
1 min read

गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.

Loading

 

गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.

 

जळगाव प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी… या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे डॉ. निशांत घुगे यांना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य राजश्री महाजन यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले. यावेळी प्रमुख अतिथी आणि व्याख्याते डॉ. निशांत घुगे यांनी विद्यार्थीदशे पासून बचत करून त्यातून गुंतवणूक कशी करावी ,
बचत व गुंतवणूक यातील फरक, गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक का करावी? तेजी व मंदी काळातील गुंतवणूककशा प्रकारे करावी, इ. 12 वी नंतर गुंतवणूक क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक परीक्षाची तयारी कशा प्रकारे करावी तसेच गुंतवणूक क्षेत्रातील कायदे व त्यातील तरतूदी बाबत करावयाची अंमलबजावणी इ. बाबत बहुमोल मार्गदर्शन डॉ. निशांत घुगे यांनी केले, त्यांनी
विद्यार्थ्यांच्या शंकांना समर्पक उत्तरे देत त्यांना गुंतवणूक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजनहे होते. पर्यवेक्षिका प्रा.शिल्पा सरोदे व कला आणि वाणिज्य विद्या शाखांचे समन्वयक प्रा.उमेश पाटील तसेच विज्ञान शाखा समन्वयक प्रा.गुणवंत वंजारी व वाणिज्य मंडळ अध्यक्ष प्रा.ललिथा इलको हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. निवेदिता जोशी , तर आभारप्रदर्शन प्रा. दिनेश पांचपोळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अर्चना जाधव, प्रा. प्रसाद देसाई, डॉ. जयंत इंगळे प्रा. प्रविण महाजन, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.निवेदिता जोशी,प्रा.पूजा सायखेडे, प्रा.ज्योती चौधरी, प्रा. संदीप वानखेडे, प्रा.उमेश ठाकरे, आणि श्री.विजय जावळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *