गुरुपौर्णिमेच्या साक्षीने जपली गुरु-शिष्य परंपरा; विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने भारावले मान्यवर,  कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम.
1 min read

गुरुपौर्णिमेच्या साक्षीने जपली गुरु-शिष्य परंपरा; विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने भारावले मान्यवर, कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम.

Loading

 

गुरुपौर्णिमेच्या साक्षीने जपली गुरु-शिष्य परंपरा; विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने भारावले मान्यवर

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम.

नंदुरबार प्रतिनिधी
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि.२९ जुलै २०२६ रोजी ” गुरुपौर्णिमा ” निमित्ताने भारतीय संस्कृतीतील गुरू -शिष्य परंपरा अबाधित राखण्यासाठी शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मिळून एक मेकांचा आदर सन्मान व सुसंस्कारित शालेय उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी धुरा सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी व सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. दादासाहेब काशिनाथ माळी,कला शिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन सर्व मान्यवरांनी व शिक्षक आणि वर्गनायक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी इ. १० वी च्या विद्यार्थिनीं कु. भाग्यश्री कोरे, कु. हेमलता जव्हेरी कु. लक्ष्मी ठाकरे, कु. राशी गावीत, कु. कामिनी बहिरम यांनी उत्कृष्ट स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमानिमित्त सुसंस्कारांचे मूल्य रुजविण्यासाठी, आपल्या जीवनातील गुरुं बद्दल आदर सन्मान कृतज्ञता भाव दर्शनाचा अतिशय उत्कृष्ट उपक्रम घेण्यात आला. गुरुपौर्णिमा निमित्ताने भाषण, भावगीत गायन, भावगीतांवर आधारित सामुहिक व वैयक्तिक नृत्य सादरीकरण अशा विविध रंगारंग सादरीकरणातून विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आपला पहिला गुरु ” आई ” चेच गुणगान, महात्म्य प्रकट केले. चिमुकले आपल्या आई बद्दल भाषण देत असताना अत्यंत हळव्या स्वरात भावनाविवश होवून हृदयस्पर्शी अनुभव आठवणी बोलतांना मान्यवरांच्या व उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. हा एक विलक्षण प्रसंग कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. प्रत्येक सादरीकरणाला मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद देत कौतुक व बक्षीसांचा वर्षाव केला. शिक्षक भाषणातून कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी प्राचिन गुरुशिष्य परंपरा व आजची शिक्षणपद्धती यावर आपले मत मांडताना समाजाला पूर्वी प्रमाणेच सुसंस्कार रुजविण्यासाठी विद्यार्थी दशेतूनच अध्यात्मिक विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. त्याशिवाय भविष्यात उत्तम नागरिक तयार होऊ शकत नाही असे नमूद केले. मा. मुख्याध्यापक काशिनाथ माळी यांनी गुरुपौर्णिमा ही आद्य जगद्गुरू महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. असे ऐतिहासिक दाखले दिले. क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी गुरुशिष्य परंपरेची सुंदर गोष्ट सांगून विद्यार्थ्यांशी प्रश्नोतरी सुसंवाद घडवून विषय समयसुचकतेवर आधारित शेर शायरीतून विद्यार्थ्यांची मने जिंकली. व विद्यार्थ्यांना शाळेत नियमित हजर रहा हीच आम्हा शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा असेल असे आवाहन केले. यावेळी शालेय वातावरण अतिशय आनंदी भक्तीमय झाले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन लिपिक श्री. चेतन महाजन यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *