गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून गुरुजनांना कृतज्ञतेचा भावपूर्ण अभिवादन , स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात सरस्वती पूजन, मनोगते व शिक्षकांचा सन्मान उत्साहात
![]()
गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून गुरुजनांना कृतज्ञतेचा भावपूर्ण अभिवादन
स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात सरस्वती पूजन, मनोगते व शिक्षकांचा सन्मान उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील स्वर्गीय सौ पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री गोकुळ पाटील सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे दैवत सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन आभार आभार व शुभेच्छा दिल्या.
गुरु पौर्णिमेच्या अवचित्त साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतुन गुरूंची महती आणि आपल्या शिक्षकांबद्दल प्रेम व आभार व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती स्वाती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुरु आणि गुरु पौर्णिमेचे महत्त्व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर सविस्तरपणे मांडले. विद्यालयात अतिशय उत्साहात आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कीर्ती सोनार मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती वंदना पाटील मॅडम यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री राहुल पाटील सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी,शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

