बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात*
1 min read

बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात*

Loading

 

*बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात*

नवी दिल्ली, २७ जुलै २०२६ :

बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Just Rights for Children (JRC) यांच्या वतीने “Access to Justice for Children – National Consultation on Ensuring a Child’s Rights, Potential & Prosperity” या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन २७ ते ३० जुलै २०२६ दरम्यान कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेच्या उद्घाटन समारंभास भारत सरकार महिला व बाल विकास राज्यमंत्री मा. सावित्री ठाकूर, खासदार लालू कृष्ण, MP Forum for Children चे प्रतिनिधी तसेच Just Rights for Children (JRC) चे संस्थापक भुवन ऋभू यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बाल लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, बाल तस्करी रोखणे तसेच बालकांना न्यायव्यवस्थेपर्यंत सुलभ आणि प्रभावी प्रवेश मिळवून देणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बालकांच्या सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि हक्काधिष्ठित भविष्यासाठी शासन, न्यायव्यवस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेत देशभरातील बाल हक्क क्षेत्रात कार्यरत संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि विविध प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. बालकांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनुभवांची देवाणघेवाण, चांगल्या कार्यपद्धतींचे आदान-प्रदान आणि भविष्यातील कृती आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र यांच्या प्रतिनिधींनीही या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेत सहभाग नोंदविला आहे. बाल हक्क संरक्षण आणि बालकांच्या न्यायासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांसोबत अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी या परिषदेमुळे उपलब्ध झाली आहे.
बालकांचे हक्क अबाधित राहावेत, प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्याच्या क्षमता व स्वप्नांना योग्य संधी मिळावी, यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

— आधार बहुउद्देशीय संस्था
अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *