धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’ , हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती !
1 min read

धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’ , हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती !

Loading

धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’

हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती !

धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील)

श्री व्यायाम प्रसारक मंडळ, धरणगावच्या वतीने मरीमाता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या कुस्ती आखाड्यातील ‘कुस्ती का महासंग्राम’ स्पर्धेला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावण महिन्यातील चार मंगळवारांच्या पारंपरिक कुस्ती आखाड्याच्या उपक्रमांतर्गत झालेल्या या महासंग्रामात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नामवंत मल्लांनी सहभाग घेत आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या चित्तथरारक लढतींमुळे संपूर्ण परिसर कुस्तीच्या जल्लोषात न्हाऊन निघाला. या महासंग्रामाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘खान्देश केसरी’ किताबासाठी हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर आणि उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान भारत मदने (सातारा) यांच्यात अटीतटीची कुस्ती झाली. दोन्ही मल्लांनी ताकद, डावपेच, चपळाई आणि कुस्तीतील अनुभवाच्या जोरावर एकमेकांना कडवी झुंज दिली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांनी मल्लांचा उत्साह वाढविला. अखेर पहिलवान भारत मदने यांनी बाजी मारत ‘खान्देश केसरी’ चा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या विजयाने उपस्थित कुस्तीप्रेमींनी जल्लोष केला. याशिवाय मुसा पहेलवान (इंदूर) विरुद्ध सुनील जाधव (सोलापूर) यांच्यातील कुस्तीत सुनील जाधव विजयी झाले. आकाश करे विरुद्ध सैफ अली पंजाबी यांच्यातील लढतीत सैफ अली पंजाबी यांनी विजय मिळविला. तर सुनील पहेलवान (हरियाणा) विरुद्ध इम्रान पहेलवान (संभाजीनगर) यांच्यातील कुस्तीमध्ये सुनील हरियाणा यांनी बाजी मारली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन ॲड. संजय महाजन पहिलवान, संजय महाजन एरंडोल, गोरख पहिलवान धुळे, किशोर पहिलवान यांनी केले.
या प्रमुख लढतींसह धरणगावातील स्थानिक मल्ल तसेच विविध जिल्ह्यांतून आलेल्या मल्लांच्या अनेक छोट्या-मोठ्या कुस्त्या रंगल्या. लहान गटातील मल्लांनीही आखाड्यात उतरून आपल्या अंगभूत कौशल्याचे आणि मेहनतीचे दर्शन घडविले. नवोदित मल्लांच्या उत्साहाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. पारंपरिक कुस्तीची ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी जाणवले. कार्यक्रमास जि.प.माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, सुभाष पाटील, दिनेश चौधरी, नगरसेवक हेमंत महाजन, परमेश्वर महाजन, विनय भावे, विलास महाजन, वाल्मिक पाटील, मोनू शिरसाठ, कॉन्ट्रॅक्टर आबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. बी. एन. चौधरी, भरत आसर, श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक सुरेश चौधरी, गुलाबराव वाघ, जीवन बयस, ज्ञानेश्वर महाजन, पांडुरंग महाजन, महेंद्र महाजन, राजेंद्र गायकवाड, प्रतिक जैन, पोलीस निरीक्षक गायकवाड, डीवायएसपी सुनील पाटील (चोपडा), रोशन राजपूत, बीडीओ सागर कोल्हे,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, पत्रकार बांधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मल्लांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मल्लांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. या भव्य कुस्ती महासंग्रामाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष तथा वस्ताद पहिलवान भानुदास विसावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मंगलदास भाटिया, सचिव प्रशांत वाणी, विलास येवले, खजिनदार कमलेश तिवारी तसेच संचालक ॲड. संजय महाजन, देवा महाजन, प्रकाश पाटील, शरद भोई, किशोर वाणी, किरण वाणी, दिनकर पाटील, किशोर भावे, नारायण महाजन, गुरु पहेलवान, गोपाल पाटील, किशोर महाजन, रावा भोई, बाळकृष्ण येवले, राजू न्हायदे, अरुण महाले, आप्पी पहेलवान, नंदू करोसिया, किरण सोनवणी, सुनील चौधरी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. धरणगावच्या मातीत पुन्हा एकदा पारंपरिक कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘खान्देश केसरी’ किताबाच्या लढतीने या महासंग्रामाची रंगत आणखी वाढविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *