अनिल बोरनारे यांची शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट  ५ ते ६ हजार रुपये शिक्षकांच्या खात्यात जमा झाले  मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील 35 हजार शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा
1 min read

अनिल बोरनारे यांची शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट ५ ते ६ हजार रुपये शिक्षकांच्या खात्यात जमा झाले मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील 35 हजार शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा

Loading

अनिल बोरनारे यांची शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट

५ ते ६ हजार रुपये शिक्षकांच्या खात्यात जमा झाले

मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील 35 हजार शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा

मुंबई प्रतिनिधी
शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा झाली असून अनिल बोरनारे यांनी शिक्षक दिनाला शिक्षकांनी मोठी भेट दिली असल्याचे शिक्षक महासंघाचे कार्यध्यक्ष संपत गीते यांनी सांगितले
मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील सुमारे 35 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या 3 वर्षाच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाला असल्याचे शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष संपत गीते यांनी सांगितले.

याबाबत अनिल बोरनारे यांनी मागील तीन वर्षापासून शिक्षण मंत्री शिक्षण सचिव शिक्षण संचालक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबत राज्याचे शिक्षण संचालकांनी शालार्थ टॅब उपलब्ध करून देण्याबाबत शालार्थ सिस्टीम महा आयटी मुंबई यांना निर्देश दिले आहेत.
जुलै २०२१ पासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे घरभाडे भत्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २४% वरुन २७ % पर्यंत करण्यात आली आहे. माहे ऑक्टोबर २०२१ पासून प्रत्यक्ष २७ टक्के प्रमाणे वाढ देण्यात आली आहे. मात्र जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आली नाही हा शिक्षकांवर अन्याय असून याबाबत तातडीने निर्णय घेवून थकबाकी अदा करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर या अन्यायाविरुदध आंदोलन करण्यात येईल असे अनिल बोरनारे यांनी निवेदनाव्दारे शिक्षण संचालकांना कळवले होते याबाबत तत्कालीन शिक्षण संचालक यांनी 9 मार्च 2023 च्या आदेशान्वये राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक यांना याबाबत प्रत्येक विभागात किती शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा माहे जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीचा घरभाडेभत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे याचा आढावा घेवून थकीत देयकांना संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घ्यावी. व लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी ११ माही अंदाजपत्रकात करण्यात यावी, सदर थकीत देयकांचा कालावधी हा १ वर्षावरील असल्याने शासन निर्णय दि. १५ जुलै २०१७ अन्वये सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे असे सांगून माहिती प्राप्त झालेनंतर शालार्थमध्ये टीए एरिअर्स टॅब उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र अनिल बोरनारे यांना दिले होते असे शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष संपत गीते सुभाष अंभोरे उपाध्यक्ष विजय धनवडे बृहन्मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अवधूत चव्हाण पश्चिम विभाग अध्यक्ष सुनील सानप व दक्षिण विभाग अध्यक्ष सचिन पांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *