मुंबई विद्यापीठ ठाणे विभाग क्रीडा समितीची वार्षिक नियोजन सभा संपन्न क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे:: क्रीडा संचालक मनोज रेड्डी
![]()
मुंबई विद्यापीठ ठाणे विभाग क्रीडा समितीची वार्षिक नियोजन सभा संपन्न
क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे:: क्रीडा संचालक मनोज रेड्डी
ठाणे:डोंबिवली : (मणिलाल शिंपी)मुंबई विद्यापीठ ठाणे विभाग क्रीडा समितीची शैक्षणिक वर्ष २०२६–२७ ची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) आज द एस.आय.ए. कॉलेज ऑफ हायर एज्युकेशन (स्वायत्त), डोंबिवली येथे उत्साहात संपन्न झाली.
या सभेस मुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मनोज रेड्डी, एस.आय.ए. कॉलेजचे अध्यक्ष श्री. के. व्ही. रंगनाथन, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पद्मजा अरविंद, मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळ (BOS) सदस्य डॉ. चंद्रकांत म्हात्रे, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर डॉ. यज्ञेश्वर बागराव तसेच एस.एस.टी. महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर श्री. राहुल अकुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मुंबई विद्यापीठ ठाणे विभाग क्रीडा समिती (२०२६–२७) ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी डॉ. पद्मजा अरविंद, कार्याध्यक्षपदी डॉ. दीपक गावंडे, विभागीय सचिवपदी श्री. गणेश मोरे, सहसचिवपदी सौ. रोहिणी डोंबे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सचिवपदी श्री. राहुल अकुल, सहसचिवपदी श्री. उमेश सोनावणे, तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. यद्नेश्वर बागराव व पश्चिम रेल्वेचे खो-खो खेळाडू श्री. मनोज पवार, तसेच सदस्य म्हणून सौ. जयश्री पॉल, श्री. मिलिंद ठाकूर आणि श्री. आलोक पांडे यांची निवड करण्यात आली.
सभेत उपस्थित मान्यवरांनी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील मुंबई विद्यापीठ ठाणे विभागाच्या विविध आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे नियोजन, आयोजन, गुणवत्ता वाढ आणि विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग याविषयी सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी डॉ. मनोज रेड्डी, श्री. के. व्ही. रंगनाथन आणि डॉ. पद्मजा अरविंद यांनी उपस्थित शारीरिक शिक्षण संचालकांना मार्गदर्शन करत क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.
ही सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून ठाणे विभागातील आगामी क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण दिशा देणारी ठरली.

