उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर.  अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील.
1 min read

उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर. अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील.

Loading

उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर.

अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील.

मुंबई: ठाणे ( मनिलाल शिंपी)उल्लास नवभारत साक्षरता अभियान – वारी साक्षरता रथ देहू ते पंढरपूर मार्गावर मार्गस्थ
नेवासा / लासूरने – वारकरी संप्रदायाची परंपरा आणि शिक्षणाचा जागर यांचा अनोखा संगम साधत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारी साक्षरता रथ देहू ते पंढरपूर या मार्गावर मार्गस्थ झाला आहे.
शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या संकल्पनेतून हा रथ तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वारी मार्गावरील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे हा आहे.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
हा वारी साक्षरता रथ मा. श्री. कृष्णकुमार पाटील साहेब, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे, डॉ. वंदना बाहुळ, शिक्षण उपसंचालक, वारी साक्षरता कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अनिता कडू मॅडम, सहसंचालक (योजना) यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली सुरू आहे.
या रथासोबत वारी प्रमुख म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री. सचिन अनंतकवळस योजना अधिकारी,राजू जग्गे गणेश भगत ,आरएसपीचे कोकण ,नाशिक विभागीय नोडल अधिकारी प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी, आर एस पी अधिकारी संदीप पाटील, यशवंत महाजन,संजय खैरनार आदी सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.
दरम्यान, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील साहेब यांनी स्वतः लासूरने या ठिकाणी भेट देऊन वारकऱ्यांना संबोधित केले. “अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी” असा संदेश देत शिक्षण घेतल्याने जीवनात कसे फायदे होतात, शासनाच्या नवभारत साक्षरता योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत त्यांनी जनजागृती केली.
वारी मार्गावर ठिकठिकाणी पथनाट्य, घोषवाक्य आणि पत्रक वाटपाद्वारे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार केला जात आहे. या उपक्रमाचे वारकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *