कल्याण येथील एस. एच. मुथा महाविद्यालयात एन एस एस युनिट तर्फे वृक्षारोपण
![]()
कल्याण येथील एस. एच. मुथा महाविद्यालयात एन एस एस युनिट तर्फे वृक्षारोपण
ठाणे:कल्याण :(मनिलाल शिंपी )पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय, कल्याण (पश्चिम) येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसर व महाविद्यालयाबाहेरील रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रकाश मुथा यांच्या प्रेरणेने व प्राचार्या सौ. अनुजा ब्रह्म यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन, स्वच्छ व हरित परिसराची निर्मिती तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे. हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमात पदवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सौ. जागृती शेलार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी श्री. जगन मिरकुटे,तसेच सौ.वैशाली घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वरिष्ठ प्राध्यापक श्री.सुनील सूर्यराव सर,तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व समिती सदस्य, पदवी व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी पर्यावरणपूरक रोपे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली.
या उपक्रमामुळे परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी कार्यक्रम अधिकारी यांनी दिला. कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

