मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी
1 min read

मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी

Loading

मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी
धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे परीट-धोबी समाजात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, मानसिक छळ आणि त्रासामुळे एका निष्पाप अल्पवयीन मुलीला आपले जीवन संपवावे लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. या प्रकरणातील दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून निष्पक्ष व सखोल तपास करण्यात यावा, तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी समाजबांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांवरील अत्याचार आणि मानसिक छळाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
“जानवीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत समाजाच्या प्रतिनिधींनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा इशारा दिला. आवश्यकता भासल्यास व्यापक लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी रविंद्र जाधव, विजय वाघ, उमेश वाल्हे, भरत जावदेकर, दीपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, गणेश वाल्हे, अनिल मांडोळे, अनिल पवार, परशुराम महाले, सुरेशचंद्र येशी, विकी जाधव, अशोक येशी, अरुण जाधव, लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी, केशव परदेशी यांच्यासह परीट-धोबी समाजाचे अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *