पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची दुहेरी यशस्वी भरारी; राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश
![]()
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची दुहेरी यशस्वी भरारी; राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यावतीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी गट विभागासाठी घेण्यात आली होती. पाचवी विभाग गटासाठी एकूण 37 विद्यार्थी उपरोक्त परीक्षेसाठी बसले होते एकूण 24 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आणि दोन विद्यार्थी पाचवी कक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) पाटील आरव विठ्ठल 2) भामरे श्रावणी हेमंत
त्याचसोबत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी बसले होते एकूण 8 विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे नाव मराठे कैवल्य दिनेश हे असून सदर विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाने शाळेचे नाव उज्वल करून शाळेसाठी ऐतिहासिक कार्य त्यांच्याद्वारे होऊन आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य करून सर्वांच्या गुणगौरवास पात्र ठरुन त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
त्याचसोबत इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी राज्यातून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भामरे श्रावणी अजय हिस रोख राशी 1000 रुपये स्मृतीचिन्ह सन्मानपत्र अशा स्वरूपात भेट देऊन मा. मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अशी दुर्मिळ कामगिरी करणारी एकमेव विद्यार्थीनी ही अमळनेर तालुक्यातील ठरली असून शैक्षणिक क्षेत्रातून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून ही ऐतिहासिक कामगिरी करून शाळेचे नाव संबंध महाराष्ट्रात उंचावून एक आदर्श तिने आपल्या कर्तृत्वातून निर्माण केले आहे. इयत्ता 5 वीचा विद्यार्थी यश चौधरी हा या उपरोक्त परीक्षेसाठी 16 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याला सुद्धा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरान्वीत करण्यात आले. सदर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन खा. शि. मंडळाचे समस्त मान्यवर संचालक मंडळ यांनी केले.
सदर परीक्षेसाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य परीक्षेसाठी ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध करून देण्यामध्ये शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे.एस देवरे, पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी ,पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही एस अमृतकर , डिंपल देसाई, प्रशांत वंजारी , एस. एस. पारधी समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

