खोकरपाट सरपंचांचा भाजपाला सोडचिट्ठीदेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; नवनियुक्त सरपंच नितीन पाटील यांनी स्वीकारला पदभार
![]()
खोकरपाट सरपंचांचा भाजपाला सोडचिट्ठीदेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश;
नवनियुक्त सरपंच नितीन पाटील यांनी स्वीकारला पदभार
अमळनेर:- तालुक्यातील खोकरपाट बहादरवाडी गृप ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच नितीन आप्पा पाटील यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
अनेक वर्षे भाजपमध्ये सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यापूर्वी सरपंच रमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी नवनियुक्त सरपंच नितीन पाटील यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शेतकी संघ संचालक रणजित भीमसिंग पाटील, हेमंत पवार, जितू ठाकूर, दिनेश पाटील (पिंपळे) माजी सरपंच, अलीम मुजावर, एल. टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
समर्थकांसह झाला प्रवेश,,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये नवनियुक्त सरपंच नितीन पाटील, नवनियुक्त सोसायटीचे चेअरमन मानसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विकास पाटील, श्रीराम पाटील, विशाल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि राजेंद्र पाटील यांचा समावेश होता.कार्यक्रमप्रसंगी उत्तम भाऊसाहेब पाटील, रमेश पाटील, रामसिंग पाटील, बापू पाटील, अंबालाल पाटील, संजय पाटील, विजयसिंह पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. खोकरपाट बहादरवाडी परिसरातील विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल तसेच विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पक्षप्रवेशामुळे खोकरपाट बहादरवाडी परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याची चर्चा असून, राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

