अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नव्या संचालक मंडळाची पहिली सभा उत्साहात संपन्न , महत्त्वाच्या प्रशासकीय व आर्थिक विषयांना एकमताने मंजुरी; संस्थेच्या प्रभावी कामकाजासाठी चार उपसमित्यांची स्थापना
1 min read

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नव्या संचालक मंडळाची पहिली सभा उत्साहात संपन्न , महत्त्वाच्या प्रशासकीय व आर्थिक विषयांना एकमताने मंजुरी; संस्थेच्या प्रभावी कामकाजासाठी चार उपसमित्यांची स्थापना

Loading

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नव्या संचालक मंडळाची पहिली सभा उत्साहात संपन्न

महत्त्वाच्या प्रशासकीय व आर्थिक विषयांना एकमताने मंजुरी; संस्थेच्या प्रभावी कामकाजासाठी चार उपसमित्यांची स्थापना

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची पहिली सभा काल संघाच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली.
नव्या नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संस्थेच्या प्रशासन, आर्थिक शिस्त, संघटनात्मक बळकटी आणि भविष्यातील कामकाजाच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेच्या प्रारंभी नवनियुक्त प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील तसेच व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे यांचा संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित संचालकांनी नव्या नेतृत्वाचे अभिनंदन करत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व नूतन चेअरमन व व्हा चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरीहिताच्या दिशेने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये एकूण सहा विषयांवर सविस्तर चर्चा करून त्यावर एकमताने निर्णय घेण्यात आले.
सर्वप्रथम दि. १० जून २०२६ रोजी झालेल्या मागील सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) वाचून ते कायम करण्यात आले. त्यानंतर दि. १ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीतील मुख्य कार्यालयाचा जमाखर्च सभेपुढे सादर करण्यात आला. उत्पन्न, खर्च तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती संचालक मंडळासमोर मांडण्यात आली. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर हा जमाखर्च एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ अंतर्गत संचालक मंडळाचे बंधपत्र (Bond) तयार करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सभेत आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे दि. १९ जून २०२६ रोजी नवनियुक्त प्रेसिडेंट यांना संस्थेच्या वतीने सह्यांचा अधिकार देण्यासाठी काढण्यात आलेल्या सर्क्युलेटिंग मेमोसला मान्यता देण्याचा होता. हा विषय सभेपुढे ठेवण्यात आला असता सर्व संचालकांनी एकमताने त्यास मंजुरी दिली.

संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक, जबाबदार आणि परिणामकारक पद्धतीने चालावे, विविध विभागांतील निर्णय प्रक्रिया जलद व्हावी तसेच प्रत्येक विभागावर स्वतंत्रपणे प्रभावी देखरेख राहावी या उद्देशाने चार स्वतंत्र उपसमित्यांची स्थापना करण्यात आली.

*शेतकी विभाग उपसमिती*
चेअरमन सुषमा वासुदेव देसले
सदस्य संजय पुनाजी पाटील, मालुबाई बापूराव पाटील, सचिन बाळू पाटील, सुरेश पिरन पाटील
आमंत्रित सदस्य प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे

*जिन विभाग उपसमिती*
चेअरमन रणजीत भीमसिंग पाटील
सदस्य संजय पुनाजी पाटील, विक्रांत भास्कर पाटील, जितेंद्र दिनकर पाटील, मालुताई बापूराव पाटील आमंत्रित सदस्य प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे

*नोकर नियंत्रण उपसमिती*
चेअरमन शंकर बंडू बैसाणे
सदस्य नितीन बापूराव पाटील, श्याम साहेबराव पवार, सचिन बाळू पाटील, प्रफुल्ल हिरालाल पवार
आमंत्रित सदस्य प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे

*शासकीय धान्य खरेदी उपसमिती*
चेअरमन विक्रांत भास्कर पाटील
सदस्य संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, सुभाष सुकलाल पाटील, नितीन बापूराव पाटील आमंत्रित सदस्य प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे

या सर्व उपसमित्यांमार्फत संबंधित विभागांचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख, आर्थिक शिस्त, कार्यक्षमता आणि शेतकरीहिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सभेच्या शेवटी प्रेसिडेंट यांच्या पूर्वपरवानगीने आयत्यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात संघाच्या सर्व विभागांचे आधुनिकीकरण, आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन, सभासद-केंद्रित सेवा आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत संघाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्व संचालकांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या प्रशासनाला अधिक बळ मिळणार असून, संघाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सभासद शेतकऱ्यांना अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास उपस्थित संचालकांनी व्यक्त केला.

यावेळी अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी संस्थेचा आर्थिक व प्रशासकीय लेखाजोखा, विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा तसेच चालू व प्रस्तावित उपक्रमांची माहिती संचालक मंडळासमोर सादर केली. संस्थेची आर्थिक स्थिती, विविध विभागांचा जमाखर्च, प्रलंबित कामे, आगामी नियोजन आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे सविस्तर सादरीकरण त्यांनी केले. संचालक मंडळातील सदस्यांनी या माहितीचा बारकाईने आढावा घेत संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच आगामी काळात अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध व शेतकरीहिताला प्राधान्य देणारे प्रशासन राबविण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *