वाढदिवसातून पर्यावरण संवर्धनाचा वसा; अरुण देशमुखांचा अभिनव उपक्रम , वाढदिवसाचा हरित संकल्प! ७६ व्या वर्षी ७६ वृक्षांची अनोखी भेट
1 min read

वाढदिवसातून पर्यावरण संवर्धनाचा वसा; अरुण देशमुखांचा अभिनव उपक्रम , वाढदिवसाचा हरित संकल्प! ७६ व्या वर्षी ७६ वृक्षांची अनोखी भेट

Loading

वाढदिवसातून पर्यावरण संवर्धनाचा वसा; अरुण देशमुखांचा अभिनव उपक्रम

वाढदिवसाचा हरित संकल्प! ७६ व्या वर्षी ७६ वृक्षांची अनोखी भेट

अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)

खवशी ता. अमळनेर येथे माजी पंचायत समिती सदस्य आणि संयुक्त पुरोगामी विचारसरणीचे खंदे कार्यकर्ते अरुण बाबुराव देशमुख यांच्या ७६ या व्या वाढदिवसानिमित्त जुने गाव व शनी मंदिर परिसरात ७६ वृक्ष लागवड करण्यात आली. अरुण देशमुख यांनी या परिसरात १००ते १५०विविध प्रजातीचे वृक्ष लागवड केलेली आहे. एकेकाळी ओसाड आणि भकास वाटणारा परिसर आज मोठ्या प्रमाणावर हिरवळीने आज माखलेला दिसत आहे. ते प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी साजरा साजरा करण्यात येणारे वर्षानुसार हे प्रकारचे वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करतात. असा उपक्रम ते गेल्या कित्येक वर्षापासून अभिनव राबवत आहेत.
नुसते वृक्षारोपण करीत नसून त्यांची निगा व काळजी घेण्याचे ही काम ते फार मोठ्या आनंदाने करत असतात ते उत्तम वृक्षप्रेमी सुद्धा आहेत. वृक्ष आणि वेलींविषयी त्यांचा गाढा अभ्यास असल्याने प्रत्येक वृक्ष व वेलींपासून पासून मिळणारे फायदे व तोटे हे ते सर्वांना ज्ञात करत असतात.

पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज आहे येथे शेतकऱ्यांना उपदेश करत असतात. शासनाकडून मिळणाऱ्या फळबागा व वृक्षारोपण संबंधित सर्व योजनांची माहिती त्यांना अवगत आहे.
तरी या वृक्षरोपण प्रसंगी उपसरपंच गणेश बाविस्कर, रोहिदास कापडे, धोंडू पानकर, कन्हैयालाल कापडे, कल्पनाबाई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडण्यासाठी गुलाब वाघ, अरुण वाघ यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *