वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड
![]()
वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तथा अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, जळगाव येथे विशेष निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडीप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांच्यासह संजय बिर्ला, सतीश मदाने, आरती हुजुरबाजार, शांता वाणी, ॲड. रविंद्र पाचपोहे, सुरेश झोपे, डॉ. नरेंद्र शिरसाठ, ए. टी. महाजन, प्रशांत अग्रवाल आणि देविदास पाटील उपस्थित होते.
या निवडीबद्दल अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारीवृंद, तसेच खान्देश शिक्षण मंडळ, मराठी वाङ्मय मंडळ आणि अमळनेर महिला मंच ट्रस्ट यांनी वसुंधरा लांडगे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकारी क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

