डॉ. दत्ता विघावे यांचा विश्व विक्रमाचा षटकार ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ बुकमध्ये नोंद
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचा विश्व विक्रमाचा षटकार ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ बुकमध्ये नोंद;
पुणे प्रतिनिधी
क्रिकेट या खेळाच्या इतिहासात आणि साहित्यात मोलाची भर घालत, ज्येष्ठ लेखक व क्रिकेट समिक्षक डॉ. दत्ता विघावे यांनी एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने (Great Winner World Records) डॉ. विघावे यांच्या क्रिकेटविषयक लेखन कार्याची दखल घेत त्यांची अधिकृत जागतिक विक्रम नोंदणी केली आहे. डॉ. विघावे यांचा हा सहावा विश्वविक्रम आहे.
डॉ. दत्ता विघावे यांनी क्रिकेटच्या ८०० वर्षांच्या इतिहासात चार ऐतिहासिक पुस्तके लिहून एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे. त्यांच्या या चार पुस्तकांमध्ये १) ‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू’, २) ‘अंपायरिंग – अ थँकलस बट नोबल जॉब’, ३) ‘वादाच्या दुनियेतील पंचगिरी’ आणि ४) ‘क्रिकेट लॉज अँड क्लॉजस’ यांचा समावेश आहे. ही पुस्तके केवळ साहित्याचा भाग नसून क्रिकेटचे ऐतिहासिक दस्तऐवज मानले जात आहेत. असे लिखान एकाच लेखकाकडून क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.
केवळ पुस्तकेच नव्हे, तर मराठी भाषेत क्रिकेट विषयावर १३,००० पेक्षा जास्त लेख लिहून दैनिक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक, वेब ब्लॉग, प्रतिलिपीवर प्रकाशित करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर जमा झाला आहे. क्रिकेटचे विद्यार्थी, खेळाडू आणि पंचांसाठी त्यांचे हे लेखन मार्गदर्शक ठरणारे आहे. पुरुष व महिला क्रिकेटवर रंजक, रोचक व रंगतदार लिखानामुळे डॉ. विघावे यांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. विघावे यांच्या या जागतिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, ३० जून २०२६ रोजी ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. क्रिकेट साहित्यातील त्यांचे हे योगदान खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका सारख्या देशांनीही त्यांची दखल घेतली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके परिवार काफ अवॉर्ड, विविध आंतरराष्ट्रीय सन्मान व पुरस्कार यापूर्वीच डॉ. दत्ता विघावे यांना प्राप्त झाले असून मानद डि. लिट पदवीने सन्मानीत असून क्रिकेट बरोबरच साहित्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक कार्य, पत्रकारीता व महिला सबलीकरणासाठी त्यांचे कार्य सुरुच आहे.

