निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार
![]()
निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार
अडावद | प्रतिनिधी | दि. ३० जून २०२६
प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावद (ता. चोपडा) येथे आरोग्य सहाय्यिका म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सौ. शोभा साहेबराव चौधरी यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी चोपडा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या हस्ते सौ. चौधरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात सौ. चौधरी यांनी सेवाकाळात आरोग्य विभागाची जबाबदारी अत्यंत समर्पित वृत्तीने पार पाडत नागरिकांच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सुशिर, डॉ. अर्चना पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोमल गोसावी, औषध निर्माण अधिकारी विजया गावित, आरोग्य सहाय्यक यशवंत पाटील, राहुल नेहरकर, आरोग्य सेवक सुभाष पिंपळसेंडे, कैलास बडगुजर, रमेश पवार, क. सहाय्यक संजय बोरसे, जीएनएम शेख शेजल, परिचर धुडकू वारडे, गट प्रवर्तक संध्या बोरसे, शालिनी सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी सौ. शोभा चौधरी यांच्या प्रदीर्घ, निस्वार्थ व रुग्णसेवेला वाहिलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीतील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी ठरेल, अशा भावना व्यक्त करत सर्वांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

