उल्लेखनीय कार्याबद्दल सौं आशाबाई पाटील यांना पाडळसरे ग्रामपंचायतचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान ,पाडळसरे ग्रामपंचायततर्फे दोन महिलांचा गौरव
![]()
उल्लेखनीय कार्याबद्दल सौं आशाबाई पाटील यांना पाडळसरे ग्रामपंचायतचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान
पाडळसरे ग्रामपंचायततर्फे दोन महिलांचा गौरव
अंमळनेर [ प्रतिनिधी ]
शासनाच्या निर्देशांनुसार गेल्यावर्षांपासून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन कर्तबगार महिलांचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन गौरव करण्याचे आदेशानुसार गावातील कर्तबगार व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पाडळसरे ग्रामपंचायतचा सौं आशाबाई वसंतराव पाटील व सौं सुनीता अशोक भिल यांना थोर समजसेविका अहिल्याबाई होळकर गौरव पुरस्कार देऊन सरपंच शुभांगी पाटील, ग्रामसेवक सुभाष भोई व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,
पाडळसरे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 2025/26 या वर्षाचा फक्त महिलांना दिला जाणारा प्रतिष्ठित अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार चामुंडा माता शेतकरी गट व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौं आशाबाई वसंतराव पाटील व सुनीता अशोक भिल यांना महिलाना एकत्रित करून सबलिकरण व सशक्तीकरणं, अध्यात्मिक व सामाजिक कार्याबद्दल शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रसह 501 रुपयाचा धनादेश देऊन सरपंच तथा प्रशासक शुभांगी पाटील व ग्रामसेवक सुभाष भोई यांच्या हस्ते प्रदान करून दिनांक 30 रोजी सकाळी ग्रामपंचायतच्या मुख्य सभागृहात विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थित देऊन सन्मानित करण्यात आले
यंदाच्या पुरस्कारासाठी सौं आशाबाई वसंतराव पाटील यांनी महिला बचत गट, शेतकरी महिला गट स्थापन करून विविध योजनेतून आर्थिकमदतीतून सबलीकरणं कल्याबद्दल , तर सुनीता अशोक भिल या आदिवासी महिलेने विविध सेवा संस्थेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात महिलांचे योगदान वाढवण्यासाठी आणि महिलांना आधुनिक शेतीचे योग्य मार्गदर्शन केल्याने ग्रामपंचायत निवड समितीकडून निवड करण्यात आली होती
यावेळी सरपंच शुभांगी पाटील,ग्रामसेवक सुभाष भोई राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रगतीशील शेतकरी विकास पाटील, विकास सोसायटीचे सचिव रणछोड पाटील,माजी सरपंच सचिन पाटील, पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील,विश्वास कोळी,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भूषण पाटील,माजी उपसरपंच प्रभाकर पाटील,भटू पाटील,हेमंत राठोड,भावना पाटील, कैलास कोळी, सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांची व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती . यावेळी महिला, युवक व प्रास्ताविक व सूत्रसंचालन भागवत पाटील यांनी केले तर आभार माजी सरपंच सचिन पाटील यांनी व्यक्त केले केले ग्रामस्थ उपस्थित होते.

