स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावचे साहित्य पुरस्कार घोषित
![]()
स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावचे साहित्य पुरस्कार घोषित
——————————————-
जळगाव:- स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे २०२५चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीशेष चमेलीभाऊराव काव्यपुरस्कार कवी अरविंद राजधर भामरे यांच्या “शापित कोलाहलाच्या नोंदी” सृजन संवाद प्रकाशन ठाणे या कवितासंग्रह संग्रहास तर स्मृतीशेष चमेलीभाऊराव कांदबरी पुरस्कार कादंबरीकार अशोक कौतिक कोळी यांच्या “डंख” गोल्डन पेज प्रकाशन पुणे यांना घोषित करण्यात येत आहे.
या वर्षी प्रथम प्रकाशन काव्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने” स्मृतीशेष कवी संजय हिंगोणेकर” काव्यपुरस्कार कवी संजय यशवंत मोखडे यांच्या “माणसं हरपत चाललेल्या वाटेवर” गाथा प्रकाशन अमरावती या काव्यसंग्रहास तर बालसाहित्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने “स्मृतीशेष नामदेव रामचंद्र सपकाळे ” पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांच्या “अखेर सापडली वाट” सकाळ प्रकाशन पुणे
या कथासंग्रहास घोषित करण्यात येत आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रू. ३०००/-रोख ,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. लवकरच “पुरस्कार आपले घरी” या अभिनव वितरणातंर्गत त्या जिल्ह्य़ातील मान्यवर लेखकांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरीत केले जातील. असे प्रतिष्ठानचे संयोजक
शशिकांत हिंगोणेकर
उषा हिंगोणेकर यांनी कळवले आहे

