स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध
1 min read

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध

Loading

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध

जळगाव जिल्हा फेडरेशनची बिनविरोध निवड; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव प्रतिनिधी :
स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित, जळगाव जिल्हा यांच्या चेअरमनपदी पारोळा येथील भगवान गंगाराम पाटील तर व्हा. चेअरमनपदी अमळनेर येथील पन्नालाल जोगीलाल मावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आंबेडकर मार्केट येथील फेडरेशनच्या कार्यालयात सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व संचालकांच्या एकमताने दोन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी दाखल झाल्याने भगवान पाटील व पन्नालाल मावळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी फेडरेशनचे सचिव जगदीश बोरसे, संस्थापक माजी चेअरमन युवराज वाघ तसेच नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. युवराज वाघ यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. बिनविरोध निवडणुकीसाठी सचिव जगदीश बोरसेयुवराज वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *