पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी  ,व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका
1 min read

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी ,व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका

Loading

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी

व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका

चाळीसगाव प्रतिनिधी :
आपले कर्तव्य बजावत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वर्तनाचा व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी असभ्य भाषा वापरणे, धमकी देणे किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाही मूल्यांना धक्का देणारी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खासदारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, शहराध्यक्ष गफार शेख, शहर उपाध्यक्ष रवींद्र कोष्टी, शहर कार्याध्यक्ष महेंद्र महाले, शहर संघटक रणधीर जाधव, शहर सल्लागार आनंद गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष राकेश निकम, तालुका कार्याध्यक्ष अजगर मुल्ला, तालुका सचिव वैभव वाघ, सदस्य खेमचंद कुमावतरोहित शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *