विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नव्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ; एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अँड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा रविवारी…
![]()
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नव्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ; एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अँड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा रविवारी…
अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अॅड. कौस्तुभ सुनील पाटील यांची झालेली निवड ही जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यास काँग्रेस व एनएसयूआयचे राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, विद्यार्थी प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि युवकांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांना नवी दिशा व नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मा. हनुमंत पवार
(प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)
मा. भाऊसाहेब आजबे
(सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)
मा.. सागर साळुंके
(प्रदेशाध्यक्ष, एन.एस.यू.आय. महाराष्ट्र)
अँड. अविनाश भालेराव
(अध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम)
मा.धनंजय शिरीष चौधरी
(अध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व)
कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषविणार आहेत.
या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
यावेळी अँड. कौस्तुभ सुनील पाटील यांनी सांगितले की पत्रकार बांधवांनी
कार्यक्रमास उपस्थित राहून वृत्तांकन करावे, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकार बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

