सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न
1 min read

सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

Loading

सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

अमळनेर | प्रतिनिधी :
सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचा विचार समाजात रुजविणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म.वा. मंडळात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि वंचितांच्या उत्थानासाठी केलेले ऐतिहासिक कार्य अधोरेखित करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी मराठी वाङ्मय मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रविंद्र कुळकर्णी, सदस्य अॅड. के. व्ही. कुलकर्णी, बन्सीलाल भागवत गुरुजी, सोमनाथ ब्रह्मे, डॉ. महेश रमण पाटील, प्रा. डॉ. विजय तुंटे, चंद्रकांत शिंदे, सुभाष पाटील, हेमंत बाळापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांचे स्मरण करून, सामाजिक न्यायाची मूल्ये जोपासण्याचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाज घडविण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थितांनी लोकराजा शाहू महाराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *