विधानसभेत मराठीची पायमल्ली; राहुल नार्वेकरांविरोधात संतापाचा उद्रेक!  शोकप्रस्ताव वाचनातील चुकांवरून युवक काँग्रेस-NSUI आक्रमक; तात्काळ राजीनाम्याची मागणी
1 min read

विधानसभेत मराठीची पायमल्ली; राहुल नार्वेकरांविरोधात संतापाचा उद्रेक! शोकप्रस्ताव वाचनातील चुकांवरून युवक काँग्रेस-NSUI आक्रमक; तात्काळ राजीनाम्याची मागणी

Loading

विधानसभेत मराठीची पायमल्ली; राहुल नार्वेकरांविरोधात संतापाचा उद्रेक!

शोकप्रस्ताव वाचनातील चुकांवरून युवक काँग्रेस-NSUI आक्रमक; तात्काळ राजीनाम्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका स्व. आशाताई भोसले यांचा शोकप्रस्ताव सादर करताना मराठी भाषेचे धिंडवडे उडवल्यामुळे मराठी भाषेचा अवमान झालेला असुन मराठी माणसाच्या अस्मितेवर गदा आणण्याचे काम त्यांनी केले आहे म्हणून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस आणि जळगाव जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (NSUI)यांच्या वतीने आज तहसीलदार कार्यालय,अमळनेर येथे निदर्शने करण्यात आले ….
जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व जळगाव जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (NSUI ) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका स्व. आशाताई भासले यांचा शोकप्रस्ताव सादर करताना मराठी भाषेतील शोकप्रस्ताव नीट-नेटकेपणाने वाचला नाही आणि अनेक चुका त्यांनी मराठी भाषा वाचताना केल्या याचा निषेध करत तहसिलदार कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला, विधानसभेचे अध्यक्षच जर मराठी भाषेचा अवमान करत असतील तर त्या सदनातील सदस्य आणि इतर अधिकारी मराठीचा मान काय राखतील अशी भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली. मराठी भाषा हा प्रत्येक मराठी माणसाचा अस्मितेचा विषय आहे विधानसभा अध्यक्षांच्या अशा वर्तनामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे मन दुखावले गेले असुन राहुल नार्वेकरांनी तात्काळ त्यांचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस (NSUI) च्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोज पाटील, अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत सुर्यवंशी,काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस अॅड रज्जाक शेख, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, NSUI जिल्हाध्यक्ष अॅड कौस्तुभ पाटील, अमळनेर विधानसभा युवक अध्यक्ष हर्षल जाधव, अमळनेर युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष राजु भाट, माजी युवक शहराध्यक्ष सईद तेली, काँग्रेस तालुकाउपाध्यक्ष शरद पाटील, रऊफ पठाण, कैलास पाटील, प्रविण पाटील, भुवन्यु सुर्यवंशी, सृजन संदानशिव, ओमराजे पाटील, किरण खैरनार, प्रशांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *