शिक्षकांचे वेतन प्रलंबित ठेवू नये, समता शिक्षक परिषदेची वेतन विभाग अधीक्षक यांच्याकडे आग्रही मागणी*
1 min read

शिक्षकांचे वेतन प्रलंबित ठेवू नये, समता शिक्षक परिषदेची वेतन विभाग अधीक्षक यांच्याकडे आग्रही मागणी*

Loading

शिक्षकांचे वेतन प्रलंबित ठेवू नये, समता शिक्षक परिषदेची वेतन विभाग अधीक्षक यांच्याकडे आग्रही मागणी

जळगांव प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आज दिनांक 10 जून 2026 रोजी नूतन वेतन विभाग अधीक्षक श्री. दिलीप पवार साहेब यांची भेट घेण्यात आली आणि स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त शाळांचे वेतन अनियमीत झाले असून काही शाळांची दोन महिन्याची तर काही शाळांची चार ते सहा महिन्याची वेतन देयके थकलेली आहेत. वेतन विभागात जमा झालेली पीएफ प्रकरणे बऱ्याच दिवसापर्यंत पेंडिंग पडलेले असतात. आपलाच पैसा आपल्यालाच मिळत नाही या बाबीने शिक्षक उद्वीग्न होतात. मेडिकल बिलाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते. या परिस्थितीला फाटा देऊन एक नियोजनबद्ध आणि काल मर्यादित ट्रान्सपरंट शिक्षक हिताची व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षा समता शिक्षक परिषदेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी आज नूतन वेतन विभाग अधीक्षक दिलीप पवार साहेब यांच्याकडे व्यक्त केली.
न्यायालयीन प्रकरणांमध्ये नावे समाविष्ट असलेल्या शिक्षकांची वेतन देयके प्रलंबित ठेवू नये, या संदर्भात मागणी शिक्षणाधिकारी माननीय कल्पनाताई चव्हाण यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून केली. एसआयटी मध्ये समाविष्ट असलेल्या शाळांकडून प्रत्येक महिन्याला वेतन मागणी अहवाल मुख्याध्यापकांकडून मागून मुख्याध्यापकांना त्रस्त करू नये तसेच ज्या शाळांची वेतन देयके कन्साॅलीडेट झाली नसतील अशा शाळांचे वेतन देयके त्वरित मार्गी लावावीत, या संदर्भात मागणी करण्यात आली.
2012 पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या जुन्या शिक्षकांना वेठीस धरणाचे प्रकार वेतन विभागाकडून व शिक्षण विभागाकडून सातत्याने होत असल्यामुळे सदर प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला.
शिक्षकांच्या अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली. समता शिक्षक परिषदेकडे आलेल्या तक्रारींचा विचार करून शिक्षकांना नक्की न्याय दिला जाईल, शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच केले जाईल, शिक्षकांची रखडलेली वेतन देयके लवकर मार्गी लावली जातील, पीएफ प्रकरण, मेडिकल बील संदर्भात कोणत्याही तक्रारी यापुढे येणार नाहीत, वरिष्ठ वेतन श्रेणी -निवड श्रेणी संदर्भात रखडलेली देयके मार्गी लावली जातील, असे आश्वासन वेतन विभाग अधीक्षक यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य समता परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी ‌ समता शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रवीण केदार सर, प्रकाश तामस्वरे सर, गणेश बच्छाव सर, समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे सर, पत्रकार सोपान भवरे, नरेंद्र वाघ भाऊसाहेब, दिनेश चव्हाण, सचिन महाजन, मनोज पाटील, दीपक पाटील, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकूर तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *