बाबासाहेबांच्या छायाचित्रामागील व्यक्ती कोण? : इतिहासाचा विपर्यास की सत्य? , बाबासाहेबांच्या फोटोतील ‘उपनिषदकार’ नव्हे, तर स्वयंपाकी सुदाम गंगावणे!
1 min read

बाबासाहेबांच्या छायाचित्रामागील व्यक्ती कोण? : इतिहासाचा विपर्यास की सत्य? , बाबासाहेबांच्या फोटोतील ‘उपनिषदकार’ नव्हे, तर स्वयंपाकी सुदाम गंगावणे!

Loading

बाबासाहेबांच्या फोटो मागील उघडं शरीर असलेली व्यक्ती ही कोणी उपनिषदकार नसून सुदाम गंगावणे आहे .
—————————————————————-
या फोटोमध्ये उभे असलेले गृहस्थ कोणतेही वेद-उपनिषदांचे जाणकार ब्राह्मण नसून, त्यांचे खरे नाव सुदाम गंगावणे (Sudama Gangawane) असे आहे आणि ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खाजगी स्वयंपाकी व घरगुती सेवक होते.
इतिहासाची मोडतोड करून सोशल मीडियावर संभ्रम निर्माण करण्यासाठी हा खोटा दावा पसरवला जात आहे की , सदर व्यक्ती ४ वेद , १०८ उपनिषदांचे जाणकार असून ते बाबासाहेबांसोबत असत . ब्राम्हण लोक बाबासाहेबांचा सन्मान करत असत वगैरे वगैरे माहिती त्यात नमूद केली आहे .व ही पोस्ट समाजमध्यामावर फिरत आहे .
*****; या संदर्भातील सत्य खालीलप्रमाणे आहे. ****
त्या उघड्या , कपाळावर , दंडावर भस्म लावलेल्या , मोठी दाढी वाढविलेल्या व्यक्तीचे नाव सुदाम गंगावणे आहे. ते अनेक वर्षे बाबासाहेबांच्या दिल्लीतील निवासस्थानी खाजगी स्वयंपाकी आणि साहाय्यक म्हणून कार्यरत होते. हा फोटो १४ एप्रिल १९५० रोजी नवी दिल्लीतील १, हार्डिंग अव्हेन्यू या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शासकीय निवासस्थानी बाबासाहेबांचा ५९ वा वाढदिवस त्यांच्या मित्रांतर्फे साजरा करण्यात आला असता काढण्यात आलेला आहे. सदर फोटो समाजमध्यमावर अर्धाच प्रकाशित करण्यात आला आहे . पूर्ण फोटो सोबत जोडला आहे .
‘ अलामी ‘ (Alamy) सारख्या जागतिक फोटो संग्रहालयांमध्ये आणि भारत सरकारच्या दप्तरांमध्ये या ऐतिहासिक फोटोची मूळ नोंद “Babasaheb Ambedkar with Maisaheb, Cook Sudama and followers” (बाबासाहेब आंबेडकर , माईसाहेब, स्वयंपाकी सुदाम आणि अनुयायी) अशीच स्पष्टपणे करण्यात आली आहे.
कपाळावर , व अन्य भागावर भस्म फासणे , टिळा लावणे , अंगावर जानवे घालणे, उपरणे पांघरणे अश्या पारंपरिक वेशभूषेमुळे एखाद्यास वेद अभ्यासक , ब्राह्मण वा मोठी बुद्धिवंत व्यक्ती समजणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे तर आहेच तसेच ते आपल्या बुद्धीचे लक्तरे काढणारे सुद्धा आहे . सदर भस्मधारी व्यक्ती बाबासाहेबांचे निष्ठावंत सेवक सुदाम हेच आहेत. सदरचा प्रचार हा ऐतिहासिक दस्तावेजाची मोडतोड करणारा तर आहेच , तसेच समाजात खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करणारा आहे .
सदरचा मुळ फोटो ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियल ‘ , पुणे येथे संग्रही आहे . फोटो विषयक माहिती ‘ मुझियम ऑफ इंडिया ‘ , दिल्ली या संग्रहालयात आहे .

लेखक

जयसिंग वाघ , जळगाव
संपर्क. ९८८१९२८८८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *