सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पास आदिवासी विभागाचे सहआयुक्त कपिल पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांची भेट,  *विद्यार्थ्यांना भेट दिली ३१००० हजार रुपये किमतीची पुस्तके-एका अधिकाऱ्याची आदर्श कृती
1 min read

सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पास आदिवासी विभागाचे सहआयुक्त कपिल पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांची भेट, *विद्यार्थ्यांना भेट दिली ३१००० हजार रुपये किमतीची पुस्तके-एका अधिकाऱ्याची आदर्श कृती

Loading

सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पास आदिवासी विभागाचे सहआयुक्त कपिल पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांची भेट

*विद्यार्थ्यांना भेट दिली ३१००० हजार रुपये किमतीची पुस्तके-एका अधिकाऱ्याची आदर्श कृती

जळगाव : सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “सतपंथ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा प्रकल्पाला” नुकतीच नाशिक विभागाचे आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपिल पवार तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी सदिच्छा भेट दिली. आपल्या खानदेशच्या मातीतून अधिकाधिक विद्यार्थी अधिकारी व्हावे या प्रेरणेने कपिल पवार कार्य करतात .याच उद्देशाने त्यांनी आज विद्यार्थ्यांना सुमारे 31 हजार रुपये किमतीची पुस्तके आपल्याकडून भेट दिली .एका अधिकाऱ्याने भावी पिढीतील नवीन अधिकारी घडविण्यासाठी केलेले हे कार्य प्रेरणादायी आहे.

यावेळी त्यांनी प्रकल्पांतर्गत एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांमधील संधी, प्रशासकीय सेवांचे महत्त्व, यशासाठी आवश्यक असलेली शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या अभ्यासातील अनुभव आणि विविध प्रश्न उपस्थित करत मान्यवरांशी मुक्त संवाद साधला.

सहआयुक्त कपिल पवार यांनी ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांनी प्रशासनात प्रवेश करून समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, नियोजनबद्ध अभ्यास आणि चिकाटी यांच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी स्वलिखित महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या पुस्तकांचे ५० संच भेट दिले.

यावेळी नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील, प्रकल्प व्यवस्थापक रमेश पाटील तसेच कुनाल पवार उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. सतपंथ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन, अध्ययन सुविधा आणि आवश्यक शैक्षणिक सहकार्य उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मान्यवरांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, या प्रेरणादायी संवादामुळे त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अधिक बळ मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

फोटो कँप्शन

सतपंथ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा प्रकल्पास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाशिक विभागाचे सहआयुक्त कपिल पवार व धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार. समवेत नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील, प्रकल्प व्यवस्थापक रमेश पाटील व कुनाल पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *