कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
![]()
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
चाळीसगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी-मनोहर ना.आंधळे यांच्या *जिंकू आम्ही लढाई* या बालकवितेचा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे,*बालभारती* तर्फे इयत्ता चौथी (इंग्रजी माध्यम शाळा) या वर्गासाठी शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ पासूनच्या नवीन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक “शिकू मराठी आनंदाने” मध्ये समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी हीच कविता *जिंकू आम्ही लढाई* (KTBS) कर्नाटक टेक्स्ट बूक सोसायटी, बेंगलोर कडून इयत्ता सातवीच्या वर्गासाठी सन २०१९ पासून पुढील दहा वर्षांसाठी निवडली गेली आहे.
तसेच सन २०२३ पासून गुजरात राज्य अभ्यासक्रम मंडळाने कवी मनोहर आंधळे यांची *अवतरले शिवराय* ही “किशोर” मासिक फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध कविता इयत्ता पाचवी च्या मराठी विषय अभ्यासक्रमात घेतली आहे.
तर सन २०१५ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या TYBA अभ्यासक्रमातील “उपयोजित मराठी” संदर्भ ग्रंथ पुस्तकात सारांश लेखनासाठी कविता समाविष्ट आहे.
गेल्या पस्तीस वर्षांपासून कविता लिखाण करणाऱ्या कवी मनोहर आंधळे यांच्या आजतागायत २९ कविता बालभारतीच्या “किशोर” मासिक पुणे मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील नामवंत दिवाळी अंक व मासिकातून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत.त्यांचे “सौरभ”, “लेकी तुझ्यासाठी” व “डोळ्यात कालचे पाणी” हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
उपरोक्त चौथीच्या अभ्यासक्रमासाठी *”निवडक किशोर*” या ग्रंथातून निवडली गेल्याचे पत्र बालभारती कार्यालयातून आंधळे यांना प्राप्त झाले आहे. या उल्लेखनीय यशाप्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगाव चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, मसाप शाखा कार्यकारी विश्वस्त तथा पत्रकार किसनराव जोर्वेकर,मसाप जिल्हा प्रतिनिधी अनुक्रमे गणेश आढाव व प्राचार्य वासुदेव वले(पाचोरा), बालभारती अभ्यासक्रम मंडळ सदस्य सुनील गायकवाड, ज्येष्ठ बंधू प्रा.वा.ना.आंधळे(एरंडोल),म.सा.प.चाळीसगाव शाखेचे पदाधिकारी व सदस्य तसेच सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजेश राठोड, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, संचालक योगेश चव्हाण यांचेसह जिल्ह्यातील साहित्यिक व शिक्षक मित्रांनी कवी आंधळेंचे अभिनंदन केले आहे.

