राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी; काव्या फेगडे राज्यात द्वितीय
1 min read

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी; काव्या फेगडे राज्यात द्वितीय

Loading

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी; काव्या फेगडे राज्यात द्वितीय

जळगाव : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. काव्या आनंद फेगडे हिने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा मान उंचावला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.

स्पर्धेत काव्याने प्रभावी विचारमांडणी, ओघवते वक्तृत्व, विषयावरील सखोल आकलन आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यांचा उत्कृष्ट संगम साधत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला सन्मानचिन्हासह रु. १,२००/- चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी काव्याचे अभिनंदन करून तिच्या भावी शैक्षणिक व स्पर्धात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांनीही तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या अंगभूत गुणांना वाव द्यावा, असे मत व्यक्त केले.

काव्याच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाने विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि सर्वांगीण प्रगतीच्या परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे.

कु. काव्या फेगडे हिच्या या यशामुळे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *