ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार,  शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा , मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा
1 min read

ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा , मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा

Loading

ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार

शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा

मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) – बारावी परीक्षेचा निकाल लागून एक महिना उलटूनही पेपर तपासणीचे मानधन न मिळाल्याने मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील हजारो ज्युनिअर कॉलेज शिक्षकांमध्ये नाराजी होती. या संदर्भात शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांशी चर्चा करून शिक्षकांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न उपस्थित केला.
याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मंडळ सचिवांनी लवकरच सर्व पात्र शिक्षकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुमारे साडेसात हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी परीक्षक व नियामक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनाची रक्कम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संबंधित बँकेमार्फत २७ एप्रिल २०२६ ते २१ मे २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने धनादेशाद्वारे अदा केली होती. त्यानुसार अनेक शिक्षकांच्या खात्यात आरटीजीएस/एनईएफटी प्रणालीद्वारे मानधन जमा करण्यात आले आहे.
मात्र, बँकेच्या काही तांत्रिक अडचणींमुळे शेकडो शिक्षकांच्या खात्यात मानधन वर्ग होण्यास विलंब झाला होता. या संदर्भात शिक्षण मंडळाने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रलंबित मानधन तातडीने शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू ठेवली आहे.
मंडळाचे अधिकारी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करीत असून, उर्वरित शिक्षकांच्या खात्यात मानधनाची रक्कम लवकरच जमा होईल, अशी माहिती अनिल बोरनारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *